मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका जवळपास १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तारक मेहता…चे प्रत्येक पात्र घराघरात ओळखले जाते. अशा स्थितीत काही काळ तरी एखादं पात्र दिसलं नाही तर प्रेक्षक अस्वस्थ होऊ लागतात. आता अशा बातम्या समोर आल्या आहेत की, तारक मेहतामध्ये जेठालालच्या बापूजी चंपकलालची भूमिका करणाऱ्या अमित भट्टने शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे. चंपक चाचाने शोमधून ब्रेक घेतल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये चंपकलालची भूमिका करणारा अमित भट्ट काही दिवसांपूर्वी शोच्या शूटिंगदरम्यान सेटवर गंभीर जखमी झाला होता. रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांनी चंपक चाचा म्हणजेच अमित भट्टला बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये त्याला काही दिवस शूटिंगमधून सुट्टी घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत तारक मेहता का उल्टा चष्मा या लेटेस्ट एपिसोडमध्ये चंपक चाचा पडद्यावर दिसणार नाही.

निर्मात्यांशी भांडण झाल्यामुळे काही कलाकारांनी यापूर्वी या शोचा निरोप घेतला होता. अशा परिस्थितीत पडद्यावर एखादे पात्र दिसले नाही तर त्या अभिनेत्यानेही निरोप घेऊन शो सोडला असे लोकांना वाटू लागते. त्यामुळेच चंपकलाल म्हणजेच अमित भट्ट पडद्यावर न दिसल्यानंतरही त्याच्यात आणि निर्मात्यामध्ये काही ठीक नसल्याचे बोलले जात आहे. पण तसे नाही, अमित भट्टला दुखापतीमुळे डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे, त्यामुळे तो शूटिंगपासून दूर आहे.