महाअपडेट टीम, 10 फेब्रुवारी 2022 : काल दिनांक ९/२/२०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ रुपाली ताई चाकणकर यांच्या अध्यक्षतेत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धुळे जिल्ह्याच्या महिला निरीक्षका सौ विजया ताई पाटील यांच्या उपस्थितीत मैत्रेय पीडित महीला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पीडित महिला मेळाव्याचे प्रमुख आयोजक आयोजक श्री नानाभाऊ पाटील, सौ उषाताई पाटील, सौ सुरेखा ताई नांद्रे, सौ छाया ताई सोमवंशी, सौ शोभा ताई आखाडे, सौ गायत्री ताई पाटील, सौ सुषमा ताई महाले, सौ संध्याताई पाटील, सौ रत्ना ताई सोनवणे, सौ पुष्पा ताई पाटील, सौ निर्मला ताई पाटील, श्री यासीन सय्यद, श्री फकीरा बिरारी व आधी पीडित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांनी सुरुवातीस कार्यक्रमास उशीर झाल्याने सर्व महिला भगिनींची दिलगिरी व्यक्त केली. मैत्री मधील गुंतवणूकदार या सर्व समाजातील गोरगरीब रस्त्यावर भाजी विक्रेते शेतामधील काम करणारे आहे तसेच झोपडपट्टी मधील धुणीभांडी करणाऱ्या महिला आहेत. त्यांच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की घरातील व संसार मधील अडचणीमध्ये घरातील आजारपण मुलाबाळांची शिक्षणातील खर्च या सर्व गोष्टींसाठी त्यांनी वेळोवेळी आपल्या रोजच्या येणाऱ्या पैशांमधून पदरमोड करीत मैत्र संस्थेमध्ये गुंतवणूक केलेला पैसा आज न मिळत असल्यामुळे त्यांना जबर फटका बसला असून ते आधांतरी झालेले आहेत व मैत्री संस्थेमधील विविध स्वरूपात काम करत असणारे सर्व एजंट महिला व पुरुष यांना आज लोकांच्या शिव्या खात त्यांच्या समोर येणाऱ्या विविध अडीअडचणींच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.

व पुढे सांगताना साहेबांनी सांगितले की माझे ३० वर्षा पासून चे कार्यकर्ते श्री नाना पाटील हेदेखील मैत्रीची काम करीत असताना मी त्यावेळेस त्यांना सांगितले होते एके दिवशी नक्कीच या गोष्टींमुळे गुंतवणूकदारांच्या विविध गोष्टींना तोंड द्यावे लागेल आणि तसेच झाले गेले काही वर्षापासून मैत्री संबंधी नाना पाटील हे माझ्याकडे येऊन व विविध माध्यमातून संस्थेतील पैशासंबंधी प्रयत्न करत होते आणि करीत आहे. आणि या विषयाची दखल घेत राज्याचे गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्याकडे सुरुवातीस बैठक झाली व त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महिला व त्यांच्या समोर सध्या उपस्थित असलेल्या अडचणींविषयी विषयांची व्याप्ती निदर्शनात आली आणि तेव्हापासून एक निर्णय घेऊन या संस्थेमधील अनेक गोरगरीब पीडीत महिलांचे पैसे अडकल्यामुळे त्यांच्या परिवारातील येणारे भविष्य उध्वस्त होऊ नये व त्यामुळे यामधील आमच्या सर्व त्रयस्थ गोरगरीब महिलांसाठी काम करण्याची व त्यांना न्याय मिळवून देण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिले आहे असे समजून या सर्व गोरगरीब महिलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे जाहीरपणे मी सांगितले आणि या सर्व गोरगरीब महिलांना न्याय देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करू शकते मी देखील मी त्यांना आश्वासित केले.

पुढे सांगताना गोटे साहेब म्हणाले कि मी बऱ्याच वेळा माझ्या भाषणांमधून सांगतो की मी देवळात जात नाही परंतु मी नास्तिक नाही परंतु प्रत्यक्ष परमेश्वर मी माणसाच्या चेहऱ्यावर येणाऱ्या आनंदात पाहतो ते कसे तर त्यासंबंधी उदाहरण देताना त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे उदाहरण देत सांगितले की यावेळेस गांधीजींना विविध पत्रकारांनी विचारले की आपण प्रत्येक वेळी परमेश्वराचे नाव घेता पण प्रत्यक्ष परमेश्वर हा आपण कधी पाहिला आहे का? त्यावेळी महात्मा गांधी यांनी सांगितले की नाही परंतु देशातील दरिद्री नारायणा असलेल्या गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील समाधानाची रेषा उमटते त्यावेळेस यामध्ये साक्षात परमेश्वराचा भाव मला होतो आणि ह्याच भावनेने प्रेरित होऊन मैत्री संस्थेमधील पीडितांचे काम करण्याचे मी ठरविले आणि संस्थेतील गोरगरीब महिलांना न्याय देऊन त्यांचा पैसा मिळवून देण्याचे काम हे साक्षात ईश्वरी प्रेरित आहे असे समजून मी करीत आहे.

आणि ते मी केल्याशिवाय शांत बसणार नाही. असे सांगून पुढे नाशिक मधील उदाहरण देत तसेच कार्य सबंध महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी व्हावे व पुढे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घालून दिलेल्या चांगल्या सवयी व त्या सगळ्यांविषयी दाखला देत प्रामाणिकपणे काम करण्याचे चांगले फळ म्हणजे आज पावेतो धुळेकरांनी मला ३ वेळा निवडून दिले तसेच यावेळी देखील मला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आणि आजपावेतो माझ्या अशाच प्रामाणिक कामांवर विश्वास ठेवून धुळे कर जनता विश्वासाने माझ्या पाठीशी उभी आहे आणि त्यांचा माझ्या वरील ईश्वरी आशीर्वादाच्या बळावरच मी आज आपणा समोर उभा आहे आणि पुन्हा त्यांनी सौ रुपाली ताई यांच्याकडे आग्रहाची विनंती करीत पवार साहेबांना याविषयी लक्ष घालण्यास संबंधी मागणी करावी अशी विनंती केली.

पुढे सांगतांना म्हणाले की राजकीय जीवनात काम करताना मला प्रचंड त्रासांना सामोरे जावे लागले येऊ लागत आहे तरी मी आज पावेतो भयंकर आजार व असंख्य त्रासांपासून इथे उभा आहे ते फक्त या माय माऊली यांच्या आशीर्वादामुळेच. तसेच आज महाराष्ट्रात आपले सरकार आहे आणि आपल्या पक्षामध्ये पवार साहेबांकडे सारखे, सुप्रिया ताई सारखे अजित दादा, जयंत पाटील यांच्या सारखे कणखर नेते आहे .

त्यामुळे आपल्यासारखे भाग्यवान कोणीच नाही अशी भावना व्यक्त करीत उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकार फक्त राष्ट्रवादीचेच असेल असे देखील निक्षून सांगितले आणि पुढे संबोधित करीत असताना आज सबंध राष्ट्रवादी परिवार मैत्री पीडित महिलांच्या पाठीशी उभा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपण आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवारा सोबतच रहावे आणि आपणास रहावेच लागेल हे देखील ठामपणे सांगितले.

तसेच पुढे मुंबई येथे जयंत पाटील साहेब यांच्या समोर एका बैठकीमध्ये मैत्री संबंधी विषयावर बीड मधील एका महिलेचे उदाहरण देत त्यांच्या यासंबंधी असलेल्या खूप अभ्यासू पणाचे उदाहरण देत होते व शेवटी पुन्हा एकदा मैत्री संबंधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे आणि असेल असे आश्वासित केले.

त्यानंतर मैत्र पीडित मेळाव्याच्या कार्यक्रमा साठी अध्यक्षस्थानी आदरणीय रूपालीताई यांनी आपल्या विचार मांडताना सुरुवातीस मतदारसंघांमध्ये काम करीत असताना गोटे साहेब तळहाताच्या फोडा प्रमाणे आपल्या मतदार संघातील जनतेची काळजी घेत असतात त्यांच्याकडे पाहताच असताना ते आमच्या आदर्श नेत्यांच्या स्थानी आहे ते आजही यामुळे आम्हाला नेहमी जाणवते पुढे कार्यक्रमास येण्यास झालेल्या उशीर मुळे दिलगिरी व्यक्त करीत आहे.

अण्णा साहेबांना मला आधी सांगितले की, मी आपल्या दौऱ्यात कार्यक्रमास येतो परंतु आधी आपण आमच्या मैत्र पीडित महिला मेळाव्यास येण्याचे अभिवचन द्यावे त्यांचे अडीअडचणी समजून घ्यावे असे आग्रह धरला आग्रहास साध देत किती उशीर झाला तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून महिलांशी चर्चा करून हितगुज करूयात.

पुढे सांगताना रूपाली ताई म्हणाल्या गोटे साहेबांनी आपल्याशी संबोधित करीत असताना सांगितले होते की नवऱ्याला न सांगता साडीचे कपारीत पैसे साठविले होते असेच चार वर्षापूर्वी नवऱ्याला न सांगता नवऱ्याकडून शंभर रुपये घ्यायचे पण ९० रुपये खर्च करून त्यातून दहा रुपये आमच्या साडीच्या कपारी ठेवायचे आणि हिशोब मात्र आम्ही १०० रुपयाचा द्यायचं कारण की आपल्या घरातील कुठल्याही अडीअडचणीच्या समयी व पई पाहुणे आले असताना मुलांची शिक्षणाकरता,घरातील आजारपणासाठी लागली तर आणि आम्हा महिलांसाठी अत्यंत नियोजनबद्ध संसारातील कटिबद्धता आहे आणि असेच नियोजन करीत असताना अचानक एका रात्री नोटाबंदी च्या माध्यमातून मोदी साहेबांनी ते पैसे आमच्याकडून काढून घेतले देशात कोणाचेही नुकसान नाही झाले तेवढे मोठे नुकसान सामान्य महिलांच्या आयुष्यात झाले आहे.

कारण आम्ही कुठल्याही बँकेत अकाउंट काढले नव्हते परंतु ते पैसे नवरा कर्वी बँकेत जमा करून आम्हा सर्वांचे अत्यंत नुकसान झाले आहे. आणि ते आम्ही विसरलेलो नाही आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय करायचे ते आम्ही आता ठरुनच आहोत कारण की नोटबंदीचा फायदा फक्त काही उद्योगपतींच्या झाला आणि त्यामुळे काळा पैसा खरच परत आला का हो? नाही ना? एक टक्का काळा पैसा निघाला नाही आणि मैत्री संस्थेत मधील काम मोदी साहेब यांच्या सारखेच झाले कारण की मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्यासारख्या गोरगरीब जनतेचे झाले आहे मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील झालेले आहे व त्यासंबंधी गेल्या महिन्यातील मुंबई येथे बैठक झाली त्यामध्ये भंडारा येथील काही व्यक्ती माझ्यासोबत तिथे होती त्यावेळी ग्रामविकास मंत्री यांच्याकडे ती बैठक झाली त्या मुळे आम्ही तुम्हाला फक्त आश्वासन न करिता निश्चित पण मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता व नेता तुमच्या साठी काम करेल आणि प्रयत्न देखील करतो आहे.

अण्णासाहेबांच्या उपस्थितीत मागे देखील काही सात बैठका झाल्या व उद्या ते केल्यास संबंधित बैठक आहे आणि अण्णा साहेबांनी सांगितले की हा विषय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे मांडायचा आहे तर ती जबाबदारी माझी असेल आणि अण्णांनी आपल्या ला संबोधित करताना सांगितले होते की राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आपल्या पाठीशी उभे आहे आणि आपण देखील आता अण्णा साहेबांच्या पाठीशी व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या परिवारा सोबत कुटुंबाप्रमाणे कायम राहणार आहोत अशी समोर उपस्थित महिला कर्वी ग्वाही देत आपल्या संबोधनाच्या शेवटी आम्ही प्रत्येक व्यक्ती सात्विक भावनेने आणि कुटुंब सांभाळताना तसेच सामाजिक व राजकीय वातावरणात वावरत असताना एका समाज भानाचे उद्दिष्ट ठेवून जगत असतो

त्याच भावनेने मैत्री संबंधी येणाऱ्या बैठकी बद्दल खात्री देत या विषयी चांगल्या पद्धतीने तोडगा निघेल व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटून त्याविषयी निश्चितपणे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिल सर्व अण्णा आणि आम्ही स्वतः भेटून मार्ग काढूच व राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दौऱ्याच्या निमित्ताने महिलांविषयी अत्याचाराच्या विषयी आढावा घेत महिला आयोगाच्या माध्यमातून राज्यातील सरकार आपल्या सर्व माता भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाही देत आपणास दैनंदिन जीवनात काही अडचणी असल्यास महिला आयोगाचे टोल फ्री नंबर आहे तसेच शासनाचे विविध माध्यमातून आपल्या अडी अडचणींसाठी शासकीय यंत्रणा आहे पोलीस प्रशासन,प्रशासकीय यंत्रणा आहे आणि प्रत्यक्षपणे मला फोन करून त्याविषयी आपले मत मांडू शकतात असे आश्वासित करीत महिला मेळावा संपन्न झाला. अशी माहिती मेत्रेय चे आयोजक श्री नानाभाऊ पाटील यांनी दिली.

श्री अविनाश राजाराम लोकरे
सोशलमिडिया प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे शहर कार्यकारणी यांनी ते प्रसिद्ध केले

Leave a comment

Your email address will not be published.