नवी दिल्ली : अनेकदा चित्रपट अभिनेत्री स्वत:ला आकर्षक दाखवण्यासाठी वेगवेगळे लूक अवलंबतात. अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा मार्ग स्वीकारला. मात्र, त्यानंतर त्यांना ओळखणंही कठीण झाल. एवढेच नाही तर एका अभिनेत्रीला खराब शस्त्रक्रियेमुळे जीव गमवावा लागला होता. दरम्यान, आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासाठी प्लास्टिक सर्जरी चुकीची ठरली.
अलीकडेच कन्नड चित्रपट अभिनेत्री स्वाती सतीश हिला चुकीच्या शस्त्रक्रियेचा फटका सहन करावा लागला. वास्तविक स्वातीने रूट कॅनल सर्जरी केली होती. यानंतर स्वाती सतीशचा संपूर्ण चेहरा खराब झाला. शस्त्रक्रियेनंतर बराच काळ लोटला तरी स्वातीच्या चेहऱ्यावर कोणतीही सुधारणा झालेली नाही.
चेतना राज ही कन्नड अभिनेत्री आहे जिच्या मृत्यूचे कारण चुकीची शस्त्रक्रिया होती. वास्तविक गेल्या महिन्यात चेतनाने फॅट फ्री सर्जरीचा अवलंब केला होता. मात्र त्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि वयाच्या २१ व्या वर्षी जीव गमवावा लागला.
मिनिषा लांबा हिचे नाव हिंदी सिनेविश्वातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. रणबीर कपूरसोबत ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटातून आपला ठसा उमटवणाऱ्या मनीषाने तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केली, तेव्हापासून मनीषाने स्वत:ला चित्रपटांपासून दूर केले.
कोयना मित्रा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या चित्रपटांपासून दूर असलेल्या कोयना मित्रानेही एकेकाळी नाकाची शस्त्रक्रिया करून घेतली होती. मात्र, यानंतर तिच्या चेहऱ्याच्या रूपात मोठा बदल झाला, त्यामुळे कोएना मित्राचे बॉलिवूड करिअरही संपुष्टात आले.
सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ चित्रपटातून आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आयशा टाकियाची फिल्मी कारकीर्द एका अयशस्वी शस्त्रक्रियेमुळे संपुष्टात आली. खरं तर, आयशाने ओठांची सर्जरी केली होती, पण उलट परिणाम दिसला, ज्यामुळे आयशाचा सुंदर चेहरा खराब झाला.