अनेकजण आपल्या स्वप्नातली कार घेतात. पण आवडीची कार घेतली म्हणजे ती फक्त चांगली चालवणेच आपले काम नसून, याव्यतिरिक्त कारच्या काही जबाबदाऱ्याही कारमालक म्हणून प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे.

कार मालकाला अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते, कारण असे न केल्यास तुमच्या लहान- लहान चुका तुम्हाला खूप महागात पडू शकतात. याने आर्थिक नुकसानी सोबतच तुम्हाला तुरुंगात जाण्याचा धोकाही होऊ शकतो.

म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला अशा तीन चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या सर्व कार मालकांनी टाळल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊ या चुकांबाबत…

गाडी दुसऱ्याला देऊ नका

स्वत: व्यतिरिक्त इतर कोणालाही कार देऊ नका. कुटुंबातील सदस्यांची बाब वेगळी आहे, पण बाहेरच्यांना गाड्या देण्याचे टाळा. याला असे का म्हणतात, ते उदाहरणासह समजून घ्या. समजा दुसरी एखादी व्यक्ती तुमची गाडी घेऊन काही गुन्हा करते. अशा स्थितीत तुम्ही गाडीचे मालक आहात म्हणून पोलिस आधी तुम्हाला पकडतील. तुम्ही कारचे कायदेशीर मालक आहात. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका

वाहतुकीचे नियम नेहमी पाळा. नियमांचे पालन केल्याने दोन गोष्टी घडतात, एक- तुम्हाला चलन येत नाही आणि दुसरे- वाहतूक नियमांचे पालन करून प्रवास केल्याने सुरक्षित वाहतुकीचे वातावरण तयार होते, जेणेकरून इतर लोकांनाही रस्त्यावर सहज प्रवास करता येईल. अनेक वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगात जाण्याचीही तरतूद आहे.

गाडी मेन्टेन ठेवा

कारच्या देखभालीला हलके घेऊ नका. कारची नेहमी देखभाल करा कारण कार जितकी जास्त वेळ मेन्टेन केली जाईल तितकी ती तुम्हाला साथ देईल. तुमच्या मेंटेनन्सची कमतरता असेल तर गाडी कधीही तुमची फसवणूक करू शकते. कार नेहमी वेळेवर सर्व्हिस करा. यामुळे कारचे आयुष्य वाढते आणि तुम्हाला ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव मिळतो.