महाअपडेट टीम : 17 मार्च 2022 : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022 सुरु आहे. या, वेळी अर्थसंकल्प सादर करताना अजितदादा म्हणाले की, राज्यातील जनतेवर करवाढीचा कोणताही बोजा न देता कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योगक्षेत्राच्या विकासाच्या पंचसुत्रीमुळे राज्याचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
यानंतर दुसर्या दिवशी शिरूर – हवेलीचे आमदार. अशोकबापू पवारांनी लक्षवेधी द्वारे घातला सार्वजनिक प्रश्नांना हात घेतल्याचं पाहायला मिळालं. सार्वजनिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अशा वरील दोन मुद्यांवर बापूंनी चर्चा घडवून आणली.
पोलिस स्टेशनची उभारणी…
उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार यांनी शिरूर शहरासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, उरळी कांचन गावासाठी पोलीस स्टेशन मंजूर केले आहेत. ते लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे व टाकळी हाजी येथे पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे. ते मंजूर करण्याची मागणी केली.
साखर कारखान्यांच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारणी…
मतदारसंघातील साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्याची मागणी नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे. त्या प्रस्तावास त्वरीत मंजुरी मिळावी जेणेकरून साखर कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल…
वाघोलीपर्यंत मेट्रो…
उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार यांनी वाघोलीपर्यंत मेट्रो प्रकल्प आणण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणावर सुविधा प्राप्त होणार आहे. म्हणून हा प्रकल्प लवकर मार्गी लावावा.
पी.एम.आर.डी. ए…
पी.एम.आर.डी. ए. चे सध्या काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी निवासी क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र करण्यात आले आहे. सणसवाडी गावात निवासी जागी औद्योगिक क्षेत्र करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वाघोली येथील मूलभूत समस्या..
मतदार संघातील वाघोली गाव पुणे महानगर पालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र तेथील मूलभूत समस्या उदा. घन कचरा व्यवस्थापन, पाणी, ड्रेनेज सारख्या समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. यावर तात्काळ कारवाई करत तोडगा काढण्यात यावा.
शिक्रापूर येथील अवैध बांधकाम…
शिक्रापूर येथे नदी काठावर बेकायदेशीर बांधकाम केले आहे. स्थानिक प्रशासन कारवाईच्या नावावर काहीच करत नाही. तर दुसरीकडे गरिबांच्या झोपड्या लगेच पाडल्या जातात. हे चुकीचे आहे. सर्वांना समान न्याय देण्यात यावा अशी विनंती केली.
एस. आर. ए. योजना…
एस. आर. ए. योजना केवळ मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये मर्यादित न ठेवता तिचा विस्तार करण्यात यावा.. माझ्या मतदारसंघात थेऊर, कदमवाक वस्ती, इथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आहेत. याभागात देखील हि योजना राबविण्यात यावी. त्याचबरोबर खाणकामगारांना सुद्धा या योजनेचा लाभ द्यावा. मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने विविध विकासकामांची चर्चा अधिवेशनात केली.
अन्नधान्याचा होणारा काळाबाजार…
राज्यात स्वस्त धान्य दुकानांमार्फत समाजातील दुर्बल घटकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरण केले जाते. यामध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येत असून या वितरण व्यवस्थेतील अन्नधान्याचा हा काळाबाजार रोखण्यासाठी लाभार्थींच्या खात्यात थेट अनुदान जमा करावे अशा प्रकारची सूचना बापूंनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.
मुख्यमंत्री सडक योजना…
मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार रस्ते राज्यात तयार केले जात आहेत. परंतु हे रस्ते वाहन क्षमता १० टन विचारात घेऊन तयार केले जात आहेत. अनेक भागात मोठ्या प्रमाणावर झालेले औद्योगिकीकरण, साखर कारखानदारी, मोठ्या प्रमाणावर होणारी वाळु वाहतूक लक्षात घेऊन वाहन क्षमता २० टन विचारात घेऊन रस्ते तयार करण्यात यावेत अशी सूचना लक्षवेधीच्या माध्यमातून बापूंनी सरकारला केली.