महाअपडेट टीम, 1 फेब्रुवारी 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात तरुणांना 60 लाख नोकऱ्यांचे आश्वासन देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून पुढील 25 वर्षांचा पाया रचला जाणार असल्याचे सांगण्यात आले. या अर्थसंकल्पात प्रत्येकासाठी काहीतरी ठेवल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे की पुढील तीन वर्षांत 400 नवीन वंदे भारत ट्रेन तयार करण्यात येणार आहे.

खरंतर, अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात पुढील तीन वर्षांत 400 नवीन वंदे भारत ट्रेन तयार केल्या जातील असे सांगितले आहे. यासह, 100 PM गती शक्ती कार्गो टर्मिनल पुढील तीन वर्षांत बांधले जाणार आहे. यासोबतच 8 नवीन रोपवे बांधण्यात येणार आहेत. वंदे भारत गाड्या या देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या सेमी हायस्पीड ट्रेन आहेत.

60 लाख नव्या नोकऱ्या :-

येणाऱ्या काही काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे.या माध्यमातून देशात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. विशेषतः या बजेटमधून सामान्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न असणार आहे. लवकरच LIC चा IPO बाजारात आणला जाणार असल्याची त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढणार :-

यासोबतच 2022-23 दरम्यान राष्ट्रीय महामार्गाची लांबी 25,000 किमीपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. डोंगराळ भागातील पर्वतमाळा रस्ता पीपीपी मोडवर (PPP modes) आणण्यात येणार आहे.

कशा असणार वंदे भारत ट्रेन :-

वंदे भारत ट्रेन अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. ट्रेनमध्ये ऑन बोर्ड वाय-फाय, जीपीएस आधारित पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम, सुंदर अंतर्गत सजावट, व्हॅक्यूम टॉयलेट, एलईडी लाईट, प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंट,

प्रत्येक सीटखाली रीडिंग लाइट, इंटेलिजेंट एअर कंडिशनिंग सिस्टीम, दिव्यांगांसाठी व्हील चेअर आदी सुविधा आहेत. जसे ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवेश, त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, स्वयंचलित सरकता दरवाजा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *