मुंबई : अयान मुखर्जी (Ayan Mukerji) दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ रिलीजपूर्वीच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत, त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. रणबीरच्या या चित्रपटात त्याची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणही महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचा दावा केला जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खाननंतर दीपिका पदुकोणने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात प्रवेश केला आहे. या चित्रपटात दीपिकाचा कॅमिओ दिसणार आहे. या सायन्स फिक्शन ड्रामाला दीपिकाने मान्यताही दिली आहे. मात्र, अद्याप दीपिका पदुकोण किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांनी याला दुजोरा दिलेला नाही. पण असा दावा केला जात आहे की लवकरच दीपिकाच्या भूमिकेबद्दल निर्मात्यांकडून अधिकृतपणे सांगितले जाऊ शकते.

दीपिका पदुकोणच्या आधी ‘ब्रह्मास्त्र’मध्ये शाहरुख खानच्या भूमिकेची माहिती समोर आली होती. या चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरुख खानची झलक पाहण्यात आली होती, त्यानंतर तो ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. आता या चित्रपटातील दीपिकाची भूमिका निश्चित झाली आहे. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये शाहरुख खान एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटात शाहरुख खानची भूमिका 10 मिनिटांची असेल, असा दावा केला जात आहे. चित्रपटाची सुरुवातच शाहरुख खानच्या सिक्वेन्सने होणार आहे.

स्टार स्टुडिओ, धर्मा प्रोडक्शन, प्राइम फोकस आणि स्टारलाईट पिक्चर्स निर्मित हा चित्रपट तीन भागात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग ९ सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज होण्याच्या तयारीत आहे. ‘ब्रह्मास्त्र’चा धमाकेदार ट्रेलर 15 जून, बुधवारी रिलीज झळा आहे.

Leave a comment

Your email address will not be published.