वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वेगवेगळे मोटार वाहतुकीचे नियम बनवण्यात आले आहेत. मात्र याकडे कुणीच लक्ष देत नाही. पण यामुळे अनेकांना मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागतो. यासाठी वाहतुकीचे नियम सर्वांना माहित असणे आवश्यक आहे.

तर वाहनचालकांनी सुरळीतपणे गाडी चालावावी यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहतुकीचे नियम खूप कडक केले आहेत. आता हॉर्नबाबतही कडक नियम आणला आहे. ज्यात नियमाचे उल्लंघन केल्यास मोठ्या प्रमाणत दंड भरावा लागणार आहे. जाणून घेऊ या नियमाबाबत..

हॉर्न वाजवल्यास 12 हजारांचे चलन कापले जाणार आहे

सुधारित वाहतूक नियमांनुसार, जर एखादा वाहनचालक रस्त्यावर प्रेशर हॉर्न वाजवताना आढळला तर त्याला १० हजार रुपयांचे चलन भरावे लागेल, तर नो हॉर्न झोनमध्ये हॉर्न वाजवताना पकडल्यास त्याला १० हजार रुपयांचे चलन भरावे लागेल.

तसेच तुम्ही सायलेन्स झोनमध्ये हॉर्न वाजवल्यास नियम 194F नुसार तुम्हाला 2000 रुपयांचे चलन भरावे लागेल.

धोकादायक ड्रायव्हिंग

धोकादायक ड्रायव्हिंग ही भारतातील वाहनचालकांकडून होणारी सर्वात सामान्य वाहतूक चुकांपैकी एक आहे. धोकादायक वाहन चालवण्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी आणि रस्ते सुरक्षित करण्यासाठी त्याविरोधात कडक नियम करण्यात आले आहेत. ज्याचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिस वाहनधारकांना मोठा दंड आकारतात.

धोकादायक वाहन चालवल्यास सहा महिने ते एक वर्ष तुरुंगवास किंवा 1,000-5,000 रुपये दंड अशी शिक्षा आहे. इतका मोठा दंड धोकादायक ड्रायव्हिंग करण्यापूर्वी लोकांना दोनदा विचार करायला लावतो.

जास्त वेग

ओव्हर स्पीडिंग हे भारतीय रस्त्यांवरील अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. याविरोधात वाहतुकीचे कडक नियमही करण्यात आले असून, त्याचे उल्लंघन केल्यास मोठा दंड भरावा लागतो. हे सुनिश्चित करण्यासाठी, वेगवान वाहने ओळखण्यासाठी अनेक वेग चाचणी कॅमेरे रस्त्यावर बसविण्यात आले आहेत. हलक्या मोटार वाहन चालकाला वेगात पकडले गेल्यास 1,000 ते 2,000 रुपये दंड भरावा लागतो. मध्यम प्रवासी किंवा मालवाहू वाहनांच्या चालकांसाठी 2,000 ते 40,000 रुपये दंड आहे.