रत्नागिरी : महाराष्ट्राच्या (Maharashatra) राजकारणात भाजप-मनसेची (Bjp Mns) युती होणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

मात्र गोव्याची (Goa) मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची मनसेचे सरचिटणीस आणि मनसे कामगार युनियनचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी भेट घेतल्यानंतर पुन्हा युतीच्या चर्चेने जोर घाला आहे.

गोव्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मनसेचे सरचिटणीस आणि मनसे कामगार युनियनचे अध्यक्ष मनोज चव्हाण (Manoj Chavan) यांनी घेतलेली सदिच्छा भेट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार का, याची चर्चा पुन्हा रंगते आहे.

तसेच येत्या काळात गोव्यातील काही मंत्र्यांची स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे समोरा-समोर जरी या युतीला पूर्णविराम लागला असला तरी, पडद्यामागे मात्र या युतीला नवीन वातारे फुटत आहेत.

खरे तर यापू्र्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून युतीची शक्यता फेटाळली होती. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही युतीची चर्चा झाली नसल्याचे सांगितले होते. मात्र, या दोन्ही पक्षांचे नाही, नाही म्हणजे हो का, असा अर्थही लावला जात आहे.

दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने तडाखेबंद खेळी केली. ४० पैकी २० जागांवर विजय मिळवला. भाजपने निवडणूक काळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रभारी केले आहे.

फडणवीसांनी जे पर्रिकर आणि गडकरी यांना जमले नाही, ते करून दाखवले, असे त्यांचे कौतुक झाले. त्यानंतर आता या नव्या राजकीय समीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *