महाअपडेट टीम, 27 जानेवारी 2022 : विदर्भातील चंद्रपूरमध्ये आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील रणमोचन फाट्याजवळ भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे.

या अपघातात ट्रॅक्टर व कारची समोरासमोर झालेल्या धडकेत चामोर्शी येथील भाजप नेते व ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला असून चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार गंभीर जखमी झाले आहे. या घटनेने संपूर्ण चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, गुरूवारी सकाळी गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य व चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार व त्यांचे भाऊ आनंद गण्यारपवार हे दोघे कारने चामोर्शीहुन ब्रम्हपुरीमार्गे नागपूरला जात असताना आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर ट्रॅक्टरने त्यांच्या क्रेटा कारला जोरदार धडक दिली.

या अपघातात कारमध्ये मागे बसलेले आनंद गण्यारपवार हे जागीच ठार असून अतुल गण्यारपवार व चालक हे एअरबॅगमुळे बचावले असले तरी ते जबर जखमी झाले आहे. त्यांच्या मानेला जबर दुखापत असल्याचं बोललं जातं आहे.

या घटनेत ट्रॅक्टरचालकालासुद्धा किरकोळ मार लागला. असून त्याने मात्र घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

आनंद गण्यारपवार यांच्या अवकाळी मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे. अपघाताची माहिती मिळताच ब्रह्मपुरीचे भाजप नेते माजी आमदार अतुल देशकर यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आणि अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आनंद गण्यारपवार यांच्या अपघाती निधनानंतर तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *