मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भेडिया’ 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. त्याचवेळी क्रितीसह वरुण आपला चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. नुकतेच दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान होस्ट शो ‘बिग बॉस 16’ च्या सेटवर पोहोचले होते. जिथे दोघांनी भाईजानसह शोच्या स्पर्धकांसोबत खूप मस्ती केली. शोदरम्यान सलमानने वरुण लवकरच बाप होणार असल्याचे संकेत दिले.

शोमध्ये सलमानने हे मजेशीर पद्धतीने सांगितले असले तरी सोशल मीडियावर भाई जानच्या या मोठ्या हिंटबद्दल वरुणचे चाहते खूप उत्सुक आहेत. आलिया भट्ट, बिपाशा बसू, सोनम कपूर यांच्यानंतर आता वरुण धवनची पत्नी नताशाही गुड न्यूज देणार असून वरुण बाप होणार असल्याची शक्यता चाहत्यांनी बांधली आहे. मात्र, या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे, हे तर वेळ आल्यावरच कळेल, पण सलमानच्या या गोष्टींमुळे वरुण बाप होणार असल्याच्या अटकळांना जोर आला आहे.

खरं तर, जेव्हा वरुण धवन ‘बिग बॉस 16’ च्या सेटवर क्रितीसोबत पोहोचला तेव्हा सलमानने सर्वात आधी शोमध्ये त्यांचे गाणे गाऊन स्वागत केले. यानंतर सलमान वरुण धवनसोबत एक गेम खेळतो, ज्यामध्ये वरुणला डोळ्यावर पट्टी बांधून सलमानच्या चित्रपटांचा अंदाज घ्यावा लागतो. पुढच्या क्लिपमध्ये, डोळ्यावर पट्टी बांधलेल्या वरुणला एक सॉफ्ट टॉय दिले आहे. ज्यामध्ये त्याला ‘टायगर जिंदा है’ या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे आहे.

दरम्यान, वरुणला एक सॉफ्ट टॉय देताना सलमान म्हणतो, “हे तुझ्या मुलासाठी आहे.” वरुणने लगेच उत्तर दिले, “मुलाचा जन्म अजून झालेला नाही.” ज्यावर सलमानने लगेच उत्तर दिले, “ये आया है तो बच्चा भी आएगा.” यानंतर सर्वत या चर्चेला उधाण आले.

वरुण धवनने 24 जानेवारी 2021 रोजी त्याची मैत्रीण नताशा दलालसोबत लग्न केले. या जोडप्याच्या खाजगी विवाहात काही मोजकेच सहभागी झाले होते.