मुंबई : ‘बिग बॉस 16’ या रिअॅलिटी शोमध्ये सुंबुल तौकीर खानला विशेष वागणूक मिळत आहे. प्रथम, तिच्या वडिलांना वीकेंड का वार एपिसोडमध्ये बोलावण्यात आले, जेणेकरून ते मुलीला ज्ञान देऊ शकतील आणि गेम कसा खेळायचा हे सांगू शकतील. आता काही दिवसांपूर्वी सुंबुलचे वडिलांशी फोनवर बोलणे झाले. जिथे वडिलांनी शालीन आणि टीनापासून दूर राहण्यास सांगितले आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दे असे सांगितले.

या एपिसोडपासून बिग बॉसच्या गेम प्लॅनवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एवढेच नाही तर शालीन भनोटचे वडील आणि टीना दत्ताची आई यांनीही रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच टीनाच्या आईने सुंबुलच्या वडिलांना खडसावले आहे की, तो माझ्या मुलीबद्दल असे कसे बोलू शकतो. टीना दत्ताच्या टीमने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीची आई रडताना दिसत आहे की सुंबुलचे वडील राष्ट्रीय टेलिव्हिजनवर टीनाबद्दल असे कसे बोलू शकतो.

टीनाची आई म्हणाली, “इतर स्पर्धकांच्या पालकांना मिळालेली संधी मला मिळाली नाही, म्हणून मला आज तुम्हा सर्वांशी बोलायचे आहे. माझ्या मुलीला नॅशनल टीव्हीवर शिवीगाळ करत आहेत. सुंबुलचे वडील सांगत आहेत की टीनाच्या तोंडावर लाथ मार? हे असे शब्द वापरले जात आहेत. त्यांना असे बोलण्याचा अधिकार कोणी दिला आहे. माझ्या मुलीला शिव्या देणारा तू कोण आहेस. तुमच्या मुलीची चूक होत असेल याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या मुलीवर अत्याचार कराल. हे पालकांचे कर्तव्य आहे का? आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी विचार करावा, मला किती वाईट वाटत असेल, ज्या आईच्या मुलीला असा चुकीचा आणि घाणेरडा शब्द बोलला गेला आहे.” हे सांगताना टीना दत्ताची आई पुढे रडू लागते.

तर, हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना शालीनचे वडील म्हणाले, “लोक राष्ट्रीय टेलिव्हिजनवर असेच बोलतात का? ते राष्ट्रीय टेलिव्हिजनवर चुकीचे शब्द वापरतात. ही खूप वाईक गोष्ट आहे. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या गोष्टी एडिट न करता प्रसारित करण्यात आल्या आहेत. सुंबुल वयाने लहान आहे, तसे असते तर तिला शोमध्ये पाठवायला नको होते. फॉरमॅटनुसार स्पर्धकांना बाहेरून कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही. मग सुंबुलला एवढी विशेष वागणूक कशी मिळते.” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.