मुंबई : टीव्ही सीरियल ‘इमली’ मधील आर्यन सिंह राठौरच्या व्यक्तिरेखेने लोकांची मने जिंकणाऱ्या फहमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ मध्ये पहिली वाइल्ड कार्ड एंट्री फहमान खानची असेल. ‘इमली’ बिग बॉसच्या घरात आधीच बंद आहे आणि आता फहमन खान या शोमध्ये दिसणार आहे.

ताज्या प्रोमोमध्ये, बिग बॉसने घोषणा केली की घरात प्रथम वाइल्ड कार्ड एंट्री होत आहे आणि त्यानंतर सर्व घरातील सदस्य लिव्हिंग एरियामध्ये येतात. त्यानंतर फहमान खान शोमध्ये प्रवेश करतो, जे पाहून सुंबूल तौकीर खानला धक्का बसतो. फहमन खान शोमध्ये आला आहे यावर तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सुंबुल धावत जाऊन फहमन खानला मिठी मारते.

सुंबुल तौकीर फहमनला सांगते, “हे स्वप्न आहे का, तु खरचं आला. तू येणार नव्हतास. यावर फहमन खान म्हणतो, “मला वाटले की तुला माजी गरज आहे.” सुंबुल आणि फहमन खान खूप चांगले मित्र आहेत. दोघांनी ‘इमली’मध्ये एकत्र काम केले होते. ते खूप जवळचे मित्र बनले. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. आतापर्यंत दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.