बॉलिवूडचे क्युट कपल अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची गेल्या वर्षभरापासून सगळीकडे चर्चा चालू आहे आहे. आता रणबीर आणि आलिया एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सगळ्या गोष्टींवर आता आलिया भट्टचे वडील आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी मुलीच्या लग्नावर मौन तोडले आहे.

महेश भट्ट यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आलिया-रणबीरच्या लग्नावर वक्तव्य केलं. महेश भट्ट म्हणाले, “या सर्व बातम्या अफवा आहेत. या सर्व गोष्टी खूप दिवसांपासून सुरू आहेत.” तर, त्याच मुलाखतीत रणबीरची मावशी रीमा जैन म्हणाल्या, “आम्ही काहीही तयारी केली नाही, मग इतक्या लवकर लग्न कसे होईल. होय, ही बातमी खरी असेल तर मलाही आश्चर्य वाटते. लग्न नक्की होईल पण कधी होईल माहीत नाही.”

दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. नुकतंच, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी बनारसमध्ये चित्रपटाचे शेवटचे शूट केले आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published.