DEVID
Big reaction to David Warner before the match against Sunrisers Hyderabad

मुंबई : दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील सामन्यापूर्वी भारताचा माजी फिरकी गोलंदाज पियुष चावलाने डेव्हिड वॉर्नरबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर (David Warner) शानदार खेळी करू शकेल, अशी आशा पियुष चावलाने व्यक्त केली.

सनरायझर्स हैदराबादने गेल्या मोसमानंतर डेव्हिड वॉर्नरला सोडले होते. यापूर्वी त्याला कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर संघातून वगळण्यात आले होते त्यानंतर त्याला प्लेईंगमधून देखील वगळण्यात आले होते. यानंतर त्याला आयपीएल 2022 लिलावादरम्यान दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले.

यावरच पियुष चावलाने आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “डेव्हिड वॉर्नर त्याच्या जुन्या फ्रँचायझीविरुद्ध जबरदस्त कामगिरी करू शकतो. “गेल्या वर्षी ज्या प्रकारे घडामोडी घडल्या त्या पाहता ही लढत रंजक ठरणार आहे. कदाचित गेल्या वर्षीबद्दल त्याच्या मनात काही दुःख असेल.

वॉर्नर ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, त्याला मुक्तपणे खेळायला आवडते. गेल्या सामन्यात त्याची रणनीती पूर्णपणे स्पष्ट असल्याचे आपण पाहिले. जर चेंडू त्याच्या स्लॉटमध्ये असेल तर तो निश्चितपणे त्याला मारेल. ऋषभ पंतनेही तेच केले. मात्र, मिचेल मार्श बाद झाल्यानंतर पंतने संथपणे फलंदाजी करण्यास सुरुवात केली.”

डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये खूप धावा केल्या आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत सनरायझर्स हैदराबादसाठी अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. तो संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक होता. दिल्ली कॅपिटल्सलाही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

Leave a comment

Your email address will not be published.