Elvera Britto
Big blow to Indian hockey; Former captain Elvera Britto dies

नवी दिल्ली : भारतीय हॉकी आणि भारतीय हॉकीच्या चाहत्यांसाठी मंगळवारी एक अतिशय वाईट आणि दु:खद बातमी आली. भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू एल्वेरा ब्रिट्टो यांचे निधन झाले. ब्रिट्टो 81 वर्षांच्या होत्या आणि मंगळवारी 26 एप्रिल रोजी सकाळी बेंगळुरूमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ब्रिट्टो दीर्घकाळ भारतीय महिला हॉकीची प्राणप्रतिष्ठा होत्या आणि तिच्या इतर दोन बहिणींसह त्यांनी राष्ट्रीय हॉकीवर वर्चस्व गाजवले. हॉकी इंडियाने निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला, तसेच ट्विट करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हॉकी इंडियाने मंगळवारी ट्विट करून हॉकीप्रेमींना ब्रिट्टोच्या निधनाची दुःखद माहिती दिली. हॉकी इंडियाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि 1965 मध्ये अर्जुन पुरस्कार विजेती एलवेरा ब्रिट्टो यांचे निधन झाले आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.”

1960 च्या दशकातील भारतीय महिला हॉकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एल्वेरा. त्या आणि तिच्या इतर दोन बहिणी मे आणि रीटा यांनी त्यावेळी भारतीय हॉकीवर राज्य केले. तीन बहिणींमध्ये एल्वेरा सर्वात मोठी होती आणि काही काळ भारतीय संघाच्या कर्णधारही होत्या. आपल्या बहिणींसोबत त्यांनी 1960 मध्ये कर्नाटकला सलग सात वेळा राष्ट्रीय चॅम्पियन बनवले. या चमकदार खेळासाठी, एल्वेराला 1965 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Leave a comment

Your email address will not be published.