महाअपडेट टीम, 6 फेब्रुवारी 2022 : देशातील प्रसिद्ध गायिका आणि स्वरा कोकिला या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. कालच त्यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांना आयसीयूमधून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

आज रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाल्याची माहिती दिली. लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरून आयसीयूमध्ये हलवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी शनिवारी दिली होती,

मात्र काल अचानक त्यांची प्रकृती बिघडू लागली, त्यानंतर त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. रविवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली…

लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट शोक व्यक्त केला आहे.”लता दीदींच्या गाण्यांनी अनेक इमोशन्सने ने उभारले. त्यांनी अनेक दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीतील बदल जवळून पाहिले. चित्रपटांपलीकडे, भारताच्या विकासाबद्दल त्या नेहमी भावुक असत. त्यांना नेहमीच एका मजबूत आणि विकसित भारताला पाहायचं होतं…

लता मंगेशकर अमर राहतील…

लता मंगेशकर यांच्या निधनावर सर्वच राजकीय आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून लता मंगेशकर सदैव अमर राहतील असे ट्विट केलं आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आज मुंबईत आलो आणि दु:खद बातमी ऐकली. संगीतविश्वातील त्यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही…

बॉलिवूड इंडस्ट्रीने केला शोक व्यक्त….

लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने अनेक संगीतकारांचं मोठं नुकसान केलं आहे. तत्पूर्वी शनिवारी आशा भोसले यांना रुग्णालयात पोहोचून त्यांची प्रकृती जाणून घेतली होती. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर लता मंगेशकर यांची प्रकृती बरी नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील निराशेतून स्पष्ट दिसतं होतं. त्यानंतर रविवारी म्हणजेच आज लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

लता मंगेशकर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित….

28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे जन्मलेल्या लता मंगेशकर या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित गायिका होत्या. त्यांचा सहा दशकांचा कार्यकाळ यशांनी भरलेला आहे. लताजींनी तीस पेक्षा जास्त भाषांमध्ये फिल्मी आणि बिगर फिल्मी गाणी गायली आहेत पण भारतीय सिनेमात पार्श्वगायिका म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या बहिणी आशा भोसले यांच्यासोबतच लताजींचे सर्वात मोठे योगदान चित्रपट गायनात आहे. लतादीदींच्या जादुई आवाजाने भारतासह जगभराला वेड लावलं आहे. अजूनही त्यांच्या गाण्यांची जगभरात क्रेझ आहे. लता मंगेशकर यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केलं आहे.

Leave a comment

Your email address will not be published.