इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामातील सातव्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्याही किंमतीला जिंकू इच्छितो. सलग सहा सामने गमावल्यानंतर, आणखी एका पराभवाचा अर्थ त्यांचा आयपीएल प्रवास संपुष्टात येईल.
चेन्नईविरुद्धचा सामना संघासाठी “करो किंवा मरो” असणार आहे. अशा स्थितीत संघ चांगलाच घाम गाळताना दिसत आहे. यादरम्यान संघातील खेळाडूंवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याची एक विचित्र घटना समोर आली.
मुंबई संघाच्या सराव सत्रादरम्यान मधमाशांनी हल्ला केला आहे. ही गोष्ट टीमच्या वतीनेच चाहत्यांशी शेअर केली आहे. मुंबई इंडियन्सच्या वतीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून, ही घटना घडल्यावर संघातील खेळाडूंनी कसा याचा समना केला या व्हिडिओत दिसून येत आहे.
गुरुवारी, 21 एप्रिल रोजी संध्याकाळी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबईच्या संघाला चेन्नई विरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी खेळाडू स्टेडियममध्ये सराव करत असताना अचानक हजारो मधमाशांनी खेळाडूंवर हल्ला केला. संघातील सर्व खेळाडूंनी स्वतःचे संरक्षण करण्याचा मार्ग शोधला आणि सर्वजण जमिनीवर झोपले. हा उपाय संघातील खेळाडूंना कामी आला आणि या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
मुंबई इंडियन्सची सर्वात खराब कामगिरी
या मोसमात 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईची सर्वात खराब कामगिरी पाहायला मिळाली. या मोसमात संघाने सुरुवातीपासून सलग 6 सामने गमावले आहेत. यापूर्वी, कोणत्याही हंगामात, संघ सलग सुरुवातीपासून इतके सामने हरले नव्हते. आता उर्वरित 8 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून विजय मिळवण्याचा संघाचा इरादा असेल.