सध्याच्या काळात अनेक लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. परंतु, यातील सर्वात सामान्य आजार म्हणजे हाडांचे दुखणे. पण, आजकाल तरुणांनाही हाडांच्या दुखण्याला आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या ५ वाईट सवयी हाडे कमकुवत करतात

अशा अनेक वाईट सवयी आहेत ज्यांची आपण सतत पुनरावृत्ती करत असतो, पण त्या हाडांच्या आरोग्यासाठी किती घातक आहेत हे आपल्याला माहीत नसते. राहणीमानात आणि खाण्यापिण्यात बदल करून शरीर मजबूत करता येते. आज आम्ही तुमच्यासमोर असेच काही घरगुती उपाय सांगत आहोत.

१. आळशी जीवनशैली

जर तुम्ही शरीराची कामे कमी करत असाल किंवा जास्त आळस करत असाल तर हाडे कमकुवत होण्याचे हे एक मोठे कारण आहे. चालण्यासोबतच व्यायाम करत राहणे चांगले, अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात.

२. व्हिटॅमिन डीची कमतरता

अनेक वेळा अशी घरे शहरांमध्ये बांधली जातात जिथे सूर्यप्रकाश नीट पोहोचत नाही. जर तुम्ही लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे टाळले किंवा घरातून काम केले तर सूर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात पोहोचत नाही, त्यामुळे हाडे कमकुवत होतात. मुलांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाला नाही तर मुडदूस सारखा आजार होऊ शकतो.

३. पुरेशी झोप न मिळणे

पुरेशी झोप न मिळाल्यास हाडे कमकुवत होतात, आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ७ ते ८ तास झोप न घेतल्यास कमकुवत हाडांसह इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.

४. मिठाचा अतिवापर

जर तुम्ही खारट खाण्याचे शौकीन असाल तर ही सवय तुमची हाडे कमकुवत करू शकते. मिठात सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे शरीरातून कॅल्शियम कमी होऊ लागते, हाडांच्या मजबूतीसाठी हा पोषक घटक खूप मोठा असतो.

५. आजच धूम्रपान सोडा

धुम्रपानाचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे, पण त्यामुळे हाडेही कमकुवत होतात हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल.

Leave a comment

Your email address will not be published.