रोजच्या कामाच्या व्यापामुळे अनेकांना जेवणासाठी वेळचं भेटत नाही. आपण पाहतो वेळेअभावी अनेकजण घाईघाईत जेवण करत असतात. पण हे आपल्या आरोग्यास नुकसानकारक ठरू शकते. याने आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात.

घाईघाईत जेवण केल्याने शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला घाईघाईत जेवण केल्याने तुमच्या आरोग्याला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याविषयी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ घाईघाईत जेवणाचे आरोग्यास होणारे दुष्परिणाम.

अपचन

घाईघाईत अन्न खाल्ल्यास पचनामध्ये समस्या उद्भवू शकतात. जेंव्हा घाईघाईने अन्न खाल्ले जाते तेंव्हा तोंडातील लाळ नीट काम करू शकत नाही. यामुळे तुम्हाला अन्न पचण्यास त्रास होतो. यामुळे तुम्हाला अपचनाच्या समस्येला सामोरे जावे लागते.

लठ्ठपणा

घाईघाईत जेवण केल्याने तुमचे वजन वाढते. म्हणूनच अन्न चघळणे अत्यंत आवश्यक आहे. पण घाईत तुमच्या मेंदूला हा सिग्नल मिळत नाही. यामुळे तुम्ही जास्त अन्न सेवन करता आणि या कारणामुळे तुमचा लठ्ठपणा वाढू लागतो.

मधुमेह

घाईघाईत अन्न खाल्ल्याने तुमचा लठ्ठपणा वाढतो आणि त्याचबरोबर मधुमेहाची समस्याही वाढते. लठ्ठपणामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका आणखी वाढतो.

गुदमरणे

हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हाही कोणी घाईघाईने अन्न खातो तेव्हा त्याच्या घशात अन्न अडकते. याला चोकिंग म्हणतात. हे अन्न अन्नाच्या पाईपमध्ये अडकते, यामुळे आपला श्वास गुदमरल्यासारखा होतो. ते जीवघेणे देखील असू शकते.

Leave a comment

Your email address will not be published.