नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघात सध्या मोठ्या प्रमाणात फेरबदल होत आहेत. बीसीसीआयने आधी निवड समितीच्या संपूर्ण टीमला बाहेरचा रस्ता दाखवला आणि आता कर्णधारपदातही मोठा बदल होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या येत आहेत. रिपोर्टनुसार, बीसीसीआय वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार बनवण्याचा विचार करत असून हार्दिक पांड्याला टी-20चा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

खरे तर, गेल्या दोन टी-20 विश्वचषकापासून भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब आहे. गेल्या दोन विश्वचषकात संघाचा दारुण पराभव झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या वेळीही संघाला उपांत्य फेरीत दारुण पराभव पत्करावा लागला. आता संघात बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेपूर्वी हार्दिक पंड्याला अधिकृतपणे कर्णधार म्हणून नियुक्त केले जाईल. त्याचबरोबर रोहित शर्मा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार असेल. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की,

पराभवाचा संघावर परिणाम झाला असून आता बदलाची वेळ आली आहे. आपल्या सर्वांना वाटते की रोहित शर्मा खूप योगदान देऊ शकतो परंतु असे मानले जाते की त्याच्यावर खूप जबाबदारी टाकली गेली आहे. अशा स्थितीत त्याचे वय देखील जास्त आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकाची तयारी आतापासूनच करायला हवी. हार्दिक पांड्या कर्णधारपदासाठी योग्य आहे. पुढील टी-20 मालिकेपूर्वी निवडकर्ते हार्दिक पांड्याला T20 संघाचा कर्णधार म्हणून अधिकृतपणे घोषित करतील.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका आहे.