मुंबई : बिग बॉस 16 च्या ताज्या एपिसोडमध्ये, जोरदार भांडण पाहायला मिळत आहे. शालिन भानोत आणि एमसी स्टेन यांच्यात पहिले भांडण सुरू होते, जे इतके वाढते की त्यांच्यामध्ये हाणामारी होते. शालिन आणि स्टेन यांच्या भांडणात, टीना दत्ता आणि सुंबुल या दोघी त्यांच्याच मुद्द्यावरून भांडू लागतात. सुंबुल तौकीर खान आणि टीना दत्ता यांच्यातील कॅट फाइट इतकी वाढते की टीना रागावून शालिनला सुंबूलकडेच जा म्हणते.

बिग बॉसच्या शुक्रवारच्या ‘वीकेंड का वार’ भागात सलमान खान पुन्हा एकदा कुटुंबातील सर्व सदस्यांचा क्लास घेताना दिसत आहे. सर्वप्रथम, शालिन भानोत आणि एमसी स्टेन यांच्यात कोणाची चूक आहे यावर सविस्तर सांगणार आहे. यासोबतच सलमान खान (बिग बॉस) शालीन भानोटमुळे पुन्हा एकदा सुंबुल तौकीर खानवर रागवताना दिसत आहे.

बिग बॉसच्या आगामी एपिसोडमध्ये, सलमान खान सुंबूलला फटकारताना दिसत आहे, तसेच शालिन भानोतच्या प्रेमात सुंबुल वेडी झाल्याचे म्हंटले आहे, यावर टीना दत्ताही होकार नोंदवताना दिसत आहे. यासगळ्याला शालीन जबाबदार असल्याचे सलमान म्हणतो, इतकं बोलताच सुंबुल तौकीर खान त्याच्यासमोर हात जोडून रडू लागते आणि मला घरी जायचं आहे असंही म्हणते. सुंबुलच्या या कृतीबद्दल सलमान खान तिला म्हणतो तुला कोणी थांबवलं आहे, यावरून असे दिसत आहे, की सुंबुल या आठवड्यात घराच्या बाहेर जाणार आहे.