घरोघरी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. प्रत्येकजण नैवैद्यासाठी बापाच्या आवडीचे मोदक बनवून गणरायाचे स्वागत करतात. मोदक हे खायला स्वादिष्ट असतात. लोक हे खूप आवडीने खातात.

अनेकजण फक्त गणेशोत्सवातच नाही तर इतरवेळीही मोदक बनवून खातात. तुम्हाला माहिती आहे का की मोदक खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. मोदक गोड असू शकतो, पण त्याचे कमी सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.

कारण हे तूप, नारळ, गूळ, सुका मेवा, तांदळाचे पीठ इत्यादीपासून तयार केले जाते. चला तर मग जाणून घेऊ अनेक आरोग्यदायी पदार्थांपासून बनवलेले मोदक खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात.

वजन कमी होणे

मिठाई खाणाऱ्यांना चवीमुळे आवडेल, पण वजन वाढण्याचीही त्यांना चिंता असते. मोदकाचा एक आरोग्य लाभ म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते. साखरेऐवजी गूळ घालून मोदक तयार केल्यास वजनही कमी करता येते. पोषणतज्ञांच्या मते, ज्या लोकांना साखरेचा त्रास होतो, त्यांनी गुळापासून बनवलेले मोदक खावेत.

थायरॉईड

मोदकाच्या सेवनाने थायरॉईडची समस्या कमी होऊ शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते, जे थायरॉईड ग्रंथी निरोगी ठेवतात. एवढेच नाही तर गुळाच्या मोदकाने साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल

इतर मिठाईंप्रमाणे मोदकही अनेक प्रकारे तयार केला जातो. नारळासोबत मोदक खाल्ल्यास साखरेची तृष्णा दूर होते, तसेच शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते. फायबर हे असे पोषक तत्व आहे, जे पोटात बद्धकोष्ठतेची समस्या होऊ देत नाही. आरोग्य तज्ञ देखील अशा पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतात, ज्यामध्ये भरपूर फायबर असते. आरोग्य तज्ञ म्हणतात नारळ असलेले मोदक खा, पण त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा.