निरोगी शरीरासाठी व्यायाम करणे हा एक चांगला मार्ग मानला जात आहे. अशात शरीर मजबूत करण्यासाठी बरेचसे लोक सध्या जिमची मदत घेताना दिसत आहेत. स्वतःला फिट ठेवण्यासाठी लोक तासनतास जिममध्ये व्यायाम करतात.

जिममध्ये व्यायाम केल्यानंतर थकलेल्या शरीरात ऊर्जा भरण्यासाठी काही लोक फळांचा रस पितात, काही जण कृत्रिम प्रथिनांचे सेवन करतात, तर काही लोक ग्लुकोज पिणे पसंत करतात. याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना जिम वर्कआउटनंतर सेवन करायला आवडतात.

पण जिम वर्कआऊटनंतर शरीराला ऊर्जा देण्यासाठी काहीही पिणे योग्य नाही. आज आम्ही तुम्हाला अशा 5 पेयांबद्दल सांगता आहोत, ज्यांचे जिम वर्कआउटनंतर सेवन केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

ही 5 पेये जीमनंतर पिऊ नयेत

पॅक केलेला फळांचा रस

व्यायाम केल्यानंतर पॅक केलेला रस कधीही पिऊ नये. फळांवर प्रक्रिया करून पॅक केलेला रस तयार केला जातो. प्रक्रिया केलेले फळ असल्याने पॅकेज केलेल्या रसांमध्ये आरोग्यदायी जीवनसत्त्वे आणि खनिजे नष्ट होतात, त्यामुळे शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही. खूप कमी लोकांना माहित आहे की पॅक केलेल्या फळांच्या रसामध्ये उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरपमुळे लठ्ठपणा येऊ शकतो.

चहा

व्यायाम किंवा योगानंतर चहा कधीही पिऊ नये. व्यायामानंतर चहा प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कधीकधी चहा देखील निद्रानाशाचे कारण बनू शकतो.

कॉफी

जिममध्ये व्यायाम केल्यानंतर कॉफीचे सेवन टाळा. कॉफीमधील कॅफिन गॅस्ट्रिन हार्मोनच्या उत्सर्जनास चालना देते, ज्यामुळे पोट खराब होणे, पोटदुखी, उलट्या आणि अतिसार यांसारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात.

दारू

जिम वर्कआउट केल्यानंतर शरीराला हायड्रेशनची गरज असते. परंतु अल्कोहोल आणि अल्कोहोलयुक्त पदार्थ शरीराचे निर्जलीकरण करतात. म्हणूनच व्यायामापूर्वी किंवा जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर अल्कोहोल टाळावे.

सोडा पेय

सर्व सोडा पेये जसे की कोल्ड ड्रिंक्स, सोडा वॉटर, मसाला पेये देखील जिम वर्कआऊटनंतर घेऊ नयेत. कारण त्यात असलेला सोडा तुम्हाला लगेच ऊर्जा देईल, पण सोड्याचा प्रभाव संपताच आळस आणि थकवा येऊ शकतो.