महाअपडेट टीम, 4 मार्च 2022 : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. फॉक्स क्रिकेटने ही माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं कळवलं आहे.
त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये 194 सामन्यात 293 बळी घेतले आहेत.
फॉक्स स्पोर्टने शेन वॉर्नच्या व्यवस्थापन संस्थेच्या हवाल्याने म्हटले आहे की, शेन वॉर्न थायलंडमधील व्हिलामध्ये होता, तेथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत आढळले. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही.
BREAKING
Australia cricket legend, Shane Warne, dies of ‘suspected heart attack’, aged 52.
Details: https://t.co/Q83t5FWzTb pic.twitter.com/YtQkY8Ir8p— Fox Cricket (@FoxCricket) March 4, 2022
शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे मानले जात आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, शेन वॉर्न हे थायलंडमधील कोह सामुई बेटावर होते आणि तेथे त्याच्या व्हिलामध्ये राहत होते.
महान स्पिनर शेन वॉर्नने 1993 च्या ऍशेस दरम्यान मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत महान फिरकी गोलंदाज इंग्लंडच्या माईक गॅटिंगला ज्या चेंडूवर गोलंदाजी केली, तो चेंडू क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम चेंडू असल्याचे म्हटले जात आहे. त्या चेंडूने वॉर्नचे आयुष्यच बदलून टाकले.
श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम वॉर्नच्या नावावर आहे. त्याने 1992 ते 2007 पर्यंत 145 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 25.41 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 708 बळी घेतले. मुरलीधरनने कसोटीत 800 बळी घेतले.
मनगटात जादू असणारे शेन वॉर्न आपल्या काळातील जवळपास सर्वच दिग्गजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. वॉर्नने त्याच्या 145 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दी मध्ये 708 बळी घेतले,जे मुथैया मुरलीधरन (800 विकेट) नंतर टेस्ट क्रिकेटमधील सर्वात जास्त विकेट आहे.
एवढे मोठे रेकॉर्ड पण, कधीही कर्णधार नाही बनला :-
शेन वॉर्नने शेवटची कसोटी जानेवारी 2007 मध्ये खेळली होती. 1999 मध्ये तो ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधारही बनला, पण त्याला कर्णधार होण्याची संधी मिळाली नाही. तसे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर,वॉर्नने प्रथमच IPLचे नेतृत्व केले आणि पहिला विजेता म्हणून त्याने राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवले.
रशिया-युक्रेन युद्धाबाबत ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली:-
जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्ननेही अलीकडेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने संदेश लिहून रशियाची ऍक्शन पूर्णपणे चुकीची असल्याचे वर्णन केले आहे. वॉर्नने ट्विट करून युक्रेनचे समर्थन केले आणि रशियाने घेतलेली ऍक्शन पूर्णपणे चुकीची, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.