नवी दिल्ली : शनिवारी रात्री ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी जगातील महान फिरकीपटू शेन वॉर्नला गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला महान अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्सच्या (Andrew Symonds) निधनाची बातमी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री कार अपघातात खेळाडूचा मृत्यू झाला.

आयसीसीने या अष्टपैलू खेळाडूसोबत झालेल्या अपघाताची माहिती दिली आहे. अवघ्या 46 वर्षांत खेळाडूने जगाचा निरोप घेतला. सायमंड्सोबत घडलेल्या या घटनेबाबत क्वीन्सलँड पोलिसांनी माहिती देत सांगितले की, “शहरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर पश्चिमेकडील हर्वे रेंजमध्ये रात्री 10:30 च्या सुमारास ही घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कारचा वेग जास्त असल्याने ती रस्त्यावर पलटी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.”

सायमंड्स विश्वचषक विजेत्या संघाचा भाग

जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ अजिंक्य मानला जात होता, तेव्हा सायमंड्सही त्या संघाचा महत्त्वाचा भाग होता. या खेळाडूने 2003 आणि 2007 मध्ये सलग दोन एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. २००३ मध्ये रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया भारताला अंतिम फेरीत पराभूत करून विश्वविजेता बनला होता.

ऑस्ट्रेलियासाठी त्याने 26 कसोटी सामन्यांमध्ये 1462 धावा केल्या. त्याच वेळी, त्याने 198 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 5088 धावा केल्या होत्या. 14 टी-20 सामने खेळताना सायमंड्सने 337 धावा केल्या. फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही तो संघासाठी उपयुक्त ठरला. सायमंड्सने कसोटीत 24 आणि एकदिवसीय सामन्यात 144 विकेट घेतल्या आहेत, तर T20 मध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.

Leave a comment

Your email address will not be published.