महाअपडेट टीम, 1 फेब्रुवारी 2022 : पुणे शहरातून आत्ताची सर्वात खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपवर मोठं संकट ओढवलं आहे. पुण्यातील भाजपचे तब्बल 16 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असून लवकरच ते प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

एवढंच नाही तर त्या 16 नगरसेवकांसोबत खुद्द राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत गुप्त बैठक झाली असल्याचा दावा ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

तसेच पत्रकार परिषेदेत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस किमान 122 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना पाहता स्वबळावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेवर येऊ शकते. परंतु हे सर्व पक्षस्रेष्ठींवर अवलंबून आहे.

महापालिका निवडणुकीला काही महिनेच शिल्लक असताना प्रशांत जगताप यांनी केलेल्या दाव्याने पक्षांतरांच्या चर्चांना उधाण आलं आहे. या आधीही भाजपचे नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं होतं.

तसं पाहिलं गेलं तर सध्या जनमानसांत भाजप विरोधी नाराजीचा सूर पसरला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः पुणे – पिंपरी चिंचवडमध्ये
लक्ष घातलं आहे. त्यामुळे आता प्रशांत जगताप यांचा हा दावा खरा ठरल्यास आगामी निवडणुकीत भाजपच्या चिंतेत भर पडू शकते हे मात्र नक्की !

Leave a comment

Your email address will not be published.