महाअपडेट टीम, 1 मार्च 2022 : अशोक पवारांनी मतदार संघातील प्रत्येक गावचा विकास कामांच्या माध्यमातून चेहरा – मोहरा बदलायला सुरूवात केली आहे. विकास कामांच्या भूमिपुजनांचा आणि उद्घाटनांचा नुसता सपाटाच लावला आहे.
गुनाट आणि शिंदोडी येथे विविध विकास कामांचं भूमिपुजन उरकून गुनाट गावचे युवा सरपंच गणेश कोळपे यांच्या घरी रात्री’च्या बारा वाजता स्नेहभोजनाला हजेरी लावली.
आमदार अशोक पवार हे कोळपेवाडी येथे स्नेहभोजनाला येणार म्हटल्यांवर ग्रामस्थांमध्ये उत्साहचं, आनंदाचं वातावरण होतं. अशोक पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. पण वेळेचं नियोजन विस्कटल्यामुळे आमदार साहेब स्नेहभोजनाला येतील की नाही ? असाही प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. तरी पण ग्रामस्थ आतूरतेने वाट पाहत होते.
अखेर, रात्री’च्या बारा वाजता आमदार साहेब स्नेहभोजनाला उपस्थित राहिले. पण आ. बापू येणार असल्याचे कळल्यानंतर, गुलाबराव लगड आणि दशरथराव लगड ही जोडी रस्त्यावर ठाण मांडून बसली होती.
आमदार साहेबांना स्नेहभोजनाला यायला खूप उशीर झाला. तरी ही जोडी रस्त्यावर ठाण मांडूनच होती. स्नेहभोजन झाल्यानंतर आमदार साहेब परतीच्या प्रवासाला निघाले. रस्त्यावर ही जोडी आमदार साहेबांची वाट पाहतच होती. त्यांना पाहिल्यानंतर साहेबांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
आमदार साहेबांच्या पहिल्या राजकीय पंचायत समितीच्या निवडणूकीपासून ही जोडी आजतागायत साहेबांबरोबर आहे. निष्ठा काय असते, हे या जोडीकडून शिकायला मिळते. आमदार अशोक पवारही या जोडीला कधी विसरत नाहीत.