महाअपडेट टीम, 3 फेब्रुवारी 2022 : यवतमाळमधून एक भयानक आणि खळबळजनक घटना घडल्याचे समोर आलं आहे. शिवसेना नेते सुनील डीवरे यांची घरात घुसून गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर शिवसैनिकांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली असून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना नेत्याच्या खुनामुळे जिल्ह्यात एकच खळबड उडाली आहे.

शिवसेना नेते सुनील डीवरे हे यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य  होते. अचानक येऊन अज्ञात तरुणांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना गोळ्या झाडल्या तसंच त्यांच्यावर कुऱ्हाडीचे वारही करण्यात आले. यावेळी तीन राऊंड फायर करण्यात आल्याने
ते गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात नेलं. परंतु त्यांना रुग्णालयात मृत म्हणून घोषित करण्यात आलं .
गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले आहेत. ही बातमी यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात शिवसैनिकांनी एकच गर्दी केली आहे.

पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडलं जावं आणि शिक्षा दिली जावी जेणेकरुन सुनील यांना न्याय मिळेल, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *