नवी दिल्ली : आशिया चषक 2022 च्या दुसऱ्या सुपर 4 सामन्यात, पुन्हा एकदा पाकिस्तानचा संघ टीम इंडियासमोर असणार आहे. या स्पर्धेत याआधीही हे दोन्ही संघ भिडले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा ५ विकेटने पराभव केला होता. तथापि, भारताला पाकिस्तानशी सावधगिरी बाळगावी लागेल कारण हा संघ आपला दिवस असताना कोणालाही पराभूत करू शकतो. विशेषत: पाकिस्तानच्या संघात असे 5 खेळाडू आहेत ज्यांच्यापासून भारताला सावध राहावे लागणार आहे.

बाबर आझम : पाकिस्तान संघाचा कर्णधार आणि सध्या जगातील नंबर वन टी-20 फलंदाज बाबर आझम हा भारतीय संघासाठी सर्वात मोठा धोका आहे. या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये बाबर फ्लॉप ठरला असेल, पण हा फलंदाज कधीही पुनरागमन करू शकतो आणि टीम इंडियाला जड जाऊ शकतो.

मोहम्मद रिझवान : बाबरचा सलामीचा जोडीदार मोहम्मद रिझवान हा देखील टीम इंडियासाठी मोठा धोका आहे. रिझवान जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने हाँगकाँगविरुद्ध नुकत्याच झालेल्या करा किंवा मरोच्या सामन्यात 78 धावा केल्या. टीम इंडियाला पहिल्या काही षटकांत रिजवानला बाद करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवायचे आहे.

फखर जमान : पाकिस्तानचा नंबर 3 फलंदाज फखर जमानही टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी आहे. फखरने हाँगकाँगविरुद्ध 53 धावांची उत्कृष्ट खेळी केली, त्यामुळे त्याने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. फखर अगदी सहजपणे चौकार आणि षटकार मारतो आणि टीम इंडियाला त्याच्यापासून सावध राहावे लागेल.

नसीम शाह : युवा घातक वेगवान गोलंदाज नसीम शाह हा देखील भारतासाठी मोठा धोका आहे. वेदनेने हैराण असतानाही नसीमने भारताविरुद्धच्या गेल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. नसीम शाहने हाँगकाँगची टॉप ऑर्डरही पूर्णपणे मोडीत काढली होती. केएल राहुल आणि विराट कोहलीला नसीमपासून सावधगिरी बाळगावी लागेल.

शादाब खान : पाकिस्तानचा स्टार लेगस्पिनर शादाब खानही भारतीय संघासाठी मोठा धोका आहे. शादाबने हाँगकाँगविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 4 बळी घेतले होते. शादाबनेही भारताविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. रोहित शर्मा आणि कंपनीला या गोलंदाजाचीही काळजी घ्यावी लागणार आहे.