नवी दिल्ली : आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवने भारतीय संघासाठी डावाच्या सुरुवातीसह विविध ठिकाणी फलंदाजी केली आहे आणि टी-२० संघात तो कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो, असे त्याने सांगितले. सूर्यकुमारने बुधवारी 26 चेंडूत 68 धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले आणि हाँगकाँगवर 40 धावांनी विजय मिळवून भारताने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, त्याने विविध फटके खेळले आणि सहा षटकार आणि तब्बल चौकार मारले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार म्हणाला, ‘मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो फक्त मला साधी दिली पाहिजे.’

उपकर्णधार केएल राहुल दुखापतीतून पुनरागमन करत आहे, मात्र तो आतापर्यंत स्पर्धेत त्याच गतीने खेळू शकलेला नाही. हाँगकाँगविरुद्ध त्याने 39 चेंडूत 36 धावा केल्या होत्या. जेव्हा सूर्यकुमारला विचारण्यात आले की तो रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणार का, तेव्हा तो म्हणाला, ‘तुम्ही म्हणताय की आम्ही केएल भाईला (राहुल) खेळवू नये’.

तो म्हणाला, “तो राहुल दुखापतीतून पुनरागमन करत आहे आणि त्याला थोडा वेळ हवा आहे आणि आमच्याकडे वेळ आहे.’ तो म्हणाला, ‘गोष्टी चालूच राहतील, अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपण प्रयत्न करत आहोत, प्रयोग करत आहोत. अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला करायच्या आहेत आणि त्या सराव सत्रांऐवजी सामन्यांमध्ये वापरून पाहणे चांगले होईल.”