नवी दिल्ली : अलीकडेच टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी राहुल द्रविडवर टीका केली होती. राहुल द्रविडने न्यूझीलंड दौऱ्यावर न जाऊन चूक केल्याचे त्यांनी म्हंटले होते. त्यांच्या मते राहुल द्रविडने हा ब्रेक घ्यायला नको होता. त्याचवेळी अश्विनने आता राहुल द्रविडचा बचाव केला असून त्यांना हा ब्रेक घेण्याची गरज का होती हे स्पष्ट केले आहे.

राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नुकतीच टी-20 वर्ल्ड कपमधून परतली आहे. विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत होऊन संघाला बाहेर पडावे लागले होते. T20 विश्वचषकानंतर लगेचच टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार होती. मात्र, या दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मणला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवण्यात आले असून राहुल द्रविडला ब्रेक देण्यात आला आहे. तर हार्दिक पांड्या या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार आहे.

रवी शास्त्रींच्या म्हणण्यानुसार ब्रेक घेण्यावर त्यांचा त्यावर विश्वास नाही. प्राइम व्हिडिओवर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “माझा ब्रेकवर विश्वास नाही. मला माझा संघ आणि खेळाडू समजून घ्यायचे आहेत आणि मग त्या संघाला नियंत्रणात ठेवायचे आहे. तुला इतक्या विश्रांतीची गरज का आहे. आयपीएलमध्ये तुम्हाला दोन-तीन महिन्यांचा ब्रेक मिळतो. प्रशिक्षक म्हणून विश्रांतीसाठी एवढा ब्रेक पुरेसा आहे. माझ्या मते, प्रशिक्षक नेहमी संघासोबत असायला हवा.”

राहुल द्रविडने टी-20 विश्वचषकात खूप मेहनत घेतली : अश्विन

त्याचवेळी रविचंद्रन अश्विनने या प्रकरणी राहुल द्रविडचे समर्थन केले आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, “राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मणला मुख्य प्रशिक्षक म्हणून का पाठवण्यात आले ते मी तुम्हाला सांगतो. टी-20 विश्वचषकापूर्वी राहुल द्रविड आणि त्याच्या टीमने खूप मेहनत घेतली होती. त्यांनी किती मेहनत घेतली हे मी जवळून पाहिले आहे. प्रत्येक ठिकाण आणि संघासाठी त्यांनी विशेष नियोजन केले होते. या कारणामुळे तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचला असावा. या कारणास्तव त्याला विश्रांती देण्यात आली आहे.”