महाअपडेट टीम : 19 मार्च 2022 : आमदार अशोक पवारांच्या कार्याचा चर्चा संपूर्ण राज्यात आहे. राज्याला दिशा देणारा आमदार म्हणूनही त्यांची एक आगळी वेगळी ओळख आहे. अशोक पवारांचं कार्य महान आहे. पण या महान कार्याच्या पाठीमागे एक बळकट, प्रेरणादाई हात आहे. आणि तो सुजाताभाभी पवार यांचा…
राज्यात तालुक्याच्या राजकारणात अनेक जोड्या काम करत असतात. पण अशोकबापू आणि सुजाताभाभी यांच्या सारखी स्वतःला झोकून देऊन काम करणारी जोडी शोधूनही सापडणार नाही.
परिस्थिती चांगली असो वा संकटाची. बापूंच्या खांद्याला खांदा लावून नाही तर बापूंच्या एक पाऊल पुढे भाभी असतात. कामात बापूंना भाभींची मोठी मदत आहे. म्हणून बापूंच्या कार्याचा आलेख वाढत चालला आहे. अहिल्यादेवींचं कार्य जसं लोकाभिमुख होतं. तसच कार्य सुजाताभाभींचं आहे. या कार्याची प्रचिती तालुका उघड्या डोळ्यानं पाहत आहे.
भाभींनी पूरपरस्थितीत उघड्या डोळ्यानं रात्र उजाडवली. आणि पूरग्रस्तांना मोठी मदत केली. कोरोना काळात कोरोना रुग्णांच्या माय बनल्या. दिव्यांगांच्या सेवेसाठी तर त्या सदैवं तत्परच आहेत.