महाअपडेट टीम, 8 फेब्रुवारी 2022 :आयव्ही इस्टेट कडे जाण्यासाठी नगर रोड वरून वळावे लागते. सदर आयव्ही इस्टेट मध्ये आजच्या घडीला सुमारे 4000पेक्षा जास्ती कुटुंब वास्तव्यास आहेत आणि अजुन 1000 कुटुंब नवीन प्रोजेक्ट मध्ये रहावयास येतील.
सदर प्रोजेक्ट कोलते-पाटील डेव्हलपर ह्यांनी विकसित केला आहे. सदर प्रोजेक्ट ची मान्यता घेतांना नगर रोड वरून रस्ता दाखविण्यात आला होता पण सदर रस्ता खडतर होता.ज्यांनी फ्लॅट घेतले होते त्यांना साधारण 2016-2017 पासुन रोजच जीव मुठीत धरून खडकाळ रस्त्यावरून ये-जा करावी लागत होती. त्या मध्ये अनेक जणांना अपघाताला सामोरे जावे लागले होते.
परंतु शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर सन्माननीय आमदार श्री अशोक बापु पवार साहेब, यांनी रहिवाशांची अडचण ओळखून, स्वतः पुढाकार घेऊन सरकारी यंत्रणेला हाताशी धरून, बिल्डरला कायदेशीर PMRDA कडुन नोटीस बजावली. आणि ह्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून आज रोजी जवळपास 100 %काम पुर्णत्वास नेले.
सदर रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन सन्माननीय आमदार श्री अशोक बापु पवार साहेब यांच्या हस्ते दि 23 जानेवारी 2022 रोजी संपन्न झाले आणि आज दिनांक 08 फेब्रुवारी 2022 रोजी पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. ह्या मुळे वाहतूक सुरळीत होईल आणि विभागातील नागरीकांचा त्रास देखील कमी होणार आहे
आ. श्री. अशोक बापु पवार ह्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे,आज आयव्ही इस्टेट मधील नागरिक आणि आयव्ही इस्टेट रोड वरील इतर सोसायट्यांमधील नागरिक आ. श्री. अशोक बापु पवार साहेब यांचे आभार व्यक्त करत आहेत.