स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यातील हिंग हा वेगवगेळ्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापराला जाणार खूप महत्वाचा मसाला आहे. तसेच हिंग चव व आरोग्याबरोबरच पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात फायद्याचे मानले जाते.

हे खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की हिंगच्या वापरामुळे तुम्ही पोटाच्या कोणकोणत्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. चला जाणून घेऊया…

गॅस

जर तुम्हाला अॅसिडिटी होत असेल आणि पोटात गॅसचा बराच वेळ त्रास होत असेल तर हिंग नाभीमध्ये लावा. होय कारण ते तुम्हाला आराम देऊ शकते. एवढेच नाही तर कोमट पाण्यासोबत हिंगाचे सेवन देखील करू शकता. त्यामुळे गॅसची समस्या दूर होईल.

पोटाची सूज

कधी कधी सतत पोटात दुखत राहिल्याने पोटात सूज येते. अशा परिस्थितीत या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नाभीमध्ये हिंग लावा कारण असे केल्याने आराम मिळेल.

पोटदुखीपासून आराम

पोटदुखीचा त्रास होत असल्यास तूपात हिंग मिसळून नाभीवर लावा आणि थोडावेळ झोपा. होय, कारण असे केल्याने पोटदुखी कमी होईल आणि वेदनाही कमी होतील.

पोट थंड ठेवते

असे म्हणतात की हिंग पोटाला थंड ठेवते. यासाठी थोडे ऑलिव्ह ऑईलमध्ये हिंग मिसळून नाभीवर लावा आणि काही वेळ झोपा. कारण असे नियमित केल्याने पोटातील उष्णता शांत होते.

अपचनापासून आराम

नाभीमध्ये हिंग लावल्याने अपचनाची समस्या दूर होते. होय आणि असे केल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि पचनसंस्था देखील निरोगी राहते.