कार वापरतो म्हंटल्यावर तिची काळजी घेताना फक्त ती धुवून आणि पुसून चकाचक ठेवणे असे नाही. याने ती केवळ बाहेरून नवीन वाटेल, पण आतून ती खराब झाल्याचे कळणारही नाही. यासाठी तिची सर्वदृष्टीने काळजी घेतली पाहिजे.

प्रत्येकाने गाडी चालवताना वाहनाच्या सिग्नलकडे नेहमी लक्ष दिले पाहिजे, जेणेकरुन तुम्ही मेंटेनन्स खर्चावर काही पैसे वाचवू शकाल आणि तुमचे वाहन नेहमी चांगल्या कामगिरीमध्ये ठेवू शकाल.

असे न केल्यास ती तुम्हाला कधी धोका देईल हे कळणार नाही. यासाठी कारमधील प्रत्येक बारीक समस्येवर लक्ष द्या. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यावर तुम्ही लक्ष द्यायला हवे.

गाडीच्या आतील आवाज

बंद कारच्या केबिनमधून कोणताही विचित्र आवाज येण्यास सुरुवात झाली, तर सर्वप्रथम तो आवाज कुठून येतोय हे तपासावे लागेल. जर हा आवाज वाहनाच्या आतून येत असेल तर ती गंभीर स्थिती आहे. अशी अडचण आल्यास वाहनाची सर्व्हिसिंग करून घ्या, अन्यथा पुढे मोठा त्रास होऊ शकतो.

कार ब्रेक समस्या

त्याचा ब्रेक हा कोणत्याही वाहनात अतिशय महत्त्वाचा भाग असतो. वाहन चालवताना तुमच्या आणि रस्त्यावरील इतर लोकांच्या सुरक्षेसाठी हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या वाहनाला ब्रेक लावताना काही अडचण येत असेल किंवा ते अडकू लागले किंवा जड वाटू लागले तर तुम्ही ताबडतोब तुमच्या वाहनाची सर्व्हिसिंग करून घ्या, अन्यथा वाटेत कधीही तुमच्यासाठी धोक्याचे होऊ शकते.

इंजन वार्निंग लाइटकडे लक्ष द्या

जर तुमच्या वाहनातील इंजिनमधील वार्निंग लाइट लागलेली दिसली तर याचा अर्थ तुमच्या वाहनाच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे. यामुळे इंजिनचेही नुकसान होऊ शकते. ते जतन करण्यासाठी, तुम्ही ताबडतोब तुमच्या वाहनाची सर्व्हिसिंग करून घ्यावी आणि विशेषतः इंजिन तपासले पाहिजे.