महाअपडेट टीम, 28 जानेवारी 2022 : आज शुक्रवारी राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे गेल्या वर्षी 6 ऑक्टोबरनंतरचे सर्वाधिक आहेत.
याशिवाय, राज्यातील संसर्ग दर 10.32% नोंदवला गेला, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा (15.88 टक्के) कमी आहे. आजची दैनंदिन रुग्णसंख्या 24,948 इतकी असून काल (25,425) इतकी होती.
तर गेल्या 24 तासात राज्यात Omicron चे 110 रुग्ण आढळले आहेत. यासह महाराष्ट्रातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 3,040 वर पोहोचली आहे. राज्यात 2.66 लाखांहून अधिक अँक्टिव्ह कोविड रुग्ण असून पुण्यात सध्या सर्वाधिक (85,629) अँक्टिव्ह रुग्णांची नोंद आहे .
सध्या 14,61,370 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि 3,200 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, असे राज्याच्या दैनिक आरोग्य बुलेटिनमध्ये म्हटलं आहे. मुंबईतही 1,312 ताज्या संसर्गासह (कालच्या 1,384 च्या तुलनेत) किंचित घट झाली आहे.
मात्र, मुंबईतील संसर्गाचे प्रमाण 3.25 टक्क्यांवरून 4.73 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर 83 टक्क्यांहून अधिक रुग्ण लक्षणे नसलेले आहेत.