नागपूर, दि. 19 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज १९ डिसेंबर रोजी नागपूर विमानतळ येथून शासकीय वाहनाने राजभवन येथे आगमन झाले.

आगमनप्रसंगी राजभवन येथे राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंगल, राजभवनाचे प्रभारी अधिकारी रमेश येवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लक्ष्मीकांत राऊळकर, शाखा अभियंता सचिन भोंगारे व कनिष्ठ अभियंता अमोल नासरे यांची उपस्थिती होती.