महाअपडेट टीम, 5 मार्च 2022 : ऊस तोडणी नंतर पारचट न जाळता त्याची कुट्टी करून पाचट व्यवस्थापन केले तर शेतकऱ्यास हेक्टरी चार ते पाच टनांपर्यंत सेंद्रिय खत मिळते तसेच नत्र स्फुरद पालाश ही अन्नद्रव्ये देखील यापासून उपलब्ध होतात याचा फायदा शेतकऱ्यांना जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व सुपीकता वाढवण्यासाठी होतो.

त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाचे पाचरट न जाळता त्याची पाचट कुट्टी करून घ्यावी असे आवाहन कृषी सहायक संध्या सांडभोर यांनी केले आहे घेण्यात यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ऊस पाचट मोहीम हाती घेतली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मध्ये सहभागी व्हावे ऊस पाचट कुजवण्यासाठी त्याची कुट्टी केल्यानंतर एकरी 50 किलो युरिया 50 किलो सुफला 1 लिटर डिकंपोझर ची फवारणी प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

जमिनीत ओलावा टिकून राहील, जमितील सूक्ष्म जीवांचे संवर्धन होईल, टाकाऊ पदार्थांपासून कंपोस्ट खत तयार होईल, खोडवा पिकाचे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढेल, पाण्याच्या पाळ्या कमी लागतील व तण कमी उगवल्याने तण नियंत्रणाचा खर्च कमी होईल शेती साठीच खर्च कमी होईल व उत्पादनात वाढ होईल ऊसतोडणी केल्यानंतर बहुतांश शेतकरी उसाचे पाचट जाळतात .

पाचट न जाळता ते कुजविल्यास, तसेच त्याचा वापर आच्छादन म्हणून केला तर, ऊस उत्पादनवाढ, मजुरी व पाणीबचतीसाठी याचा उपयोग होऊ शकतो.

जमिनीचा पोत सुधारून एकरी उत्पादनवाढीसाठी पाचटाचे आच्छादन फायदेशीर असल्याचे सांडभोर यांनी सांगितले.

पाचरट कुट्टी साठी संपर्क :-
रणजीत सातकर 98599 9535

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *