प्रत्येकालाच वाटते आपले केस निरोगी व त्यासोबतच सुंदर व दात असावेत. पण सध्याचे वाढते प्रदूषण, तीव्र ऊन, क्षारयुक्त दूषित पाणी यामुळे केसांच्या अनेक समस्या वाढू लागल्या आहेत. यामुळे केसगळती, केसांचा कोंडा, केस पांढरे होणे अशा समस्या वाढत आहेत. यासाठी केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

म्हणून तुमच्या या केसांच्या समस्या दूर करून तुमचे केस निरोगी बनवण्यासाठी कांद्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. याबरोबरचे या रसाच्या वापराने तुमचे केस काळेभोर दाटही होतील. चला तर मग जाणून घेऊ कांद्याचा रस आपल्या केसांवर कशाप्रकारे फायदेशीर ठरतो.

कांद्याच्या रसाने केसांना मसाज करा

कांद्याच्या रसाने केसांच्या टाळूला स्क्रब आणि तेल लावल्याने केस स्वच्छ होतात आणि रक्ताभिसरण वाढते. टाळू स्वच्छ असल्यामुळे कोंडा होण्याची समस्या होणार नाही आणि स्वच्छ छिद्रांमुळे त्यामध्ये धूळ किंवा बुरशी आणि बॅक्टेरियाचा संसर्ग होणार नाही.

कांद्याचा रस केसांची वाढ होण्यासही मदत करतो

आम्ही तुम्हाला सांगतो की केसांची वाढ होण्यासाठी असो किंवा त्यांना घट्ट करण्यासाठी कांद्याचा रस खूप फायदेशीर आहे. त्याचा रस कोणत्याही तेलासोबत केसांना लावून मसाज करू शकता. यामुळे आठवडाभरात तुम्हाला फरक दिसेल.

अशा प्रकारे कांद्याचा रस तयार करा

प्रथम कांदा किसून त्याचा रस काढा.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कांदा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस काढू शकता.
त्यानंतर या रसात लिंबाचा रस मिसळावा.
यानंतर, व्हिटॅमिन-ई कॅप्सूल घ्या आणि त्याचे तेल मिश्रणात टाका.
आता तुम्ही ते स्प्रे बाटलीत घालून केसांमध्ये वापरू शकता.

हे स्प्रे कसे वापरावे

-तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी या स्प्रेचा वापर करू शकता.
-ते लावण्यापूर्वी लक्षात ठेवा की तुमचे केस कोरडे असावेत आणि केसांमध्ये तेल नसावे.
-हा केसांचा स्प्रे वापरल्यानंतर टाळूला मसाज करा.
-केसांना मसाज केल्यानंतर तुम्हीहा केसांचा स्प्रे केसांमध्ये रात्रभर सोडू शकता.
-सकाळी उठल्यानंतर केसांना हलक्या हातांनी मसाज करा आणि नंतर केस धुवा.

Leave a comment

Your email address will not be published.