मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याची मुलगी आलिया कश्यप नेहमीच चर्चेत असते. आलिया सोशल मीडियावर तिच्या बोल्डनेसमुळे चाहत्यांमध्ये खूप चर्चेत असते. त्याचबरोबर आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत पोस्ट करताना दिसते.

यासोबतच आलिया तिच्या लव्ह लाईफबद्दलही खूप चर्चेत असते. पण या सगळ्यात आलियाच्या एका पोस्टने सोशल मीडियावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या पोस्टमध्ये तिने काही कारणास्तव मृत्यूबाबत चर्चा केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया…

झाले असे, आलिया कश्यपचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते. आलियाने ही माहिती इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले, ‘माझे खाते हॅक झाले आहे, खूप भीतीदायक… मला आत्महत्या करायची आहे. कृपया याआधी जे काही पोस्ट केले गेले किंवा तुम्हाला काही संदेश आले असतील त्याकडे दुर्लक्ष करा.’ यासोबतच आलियाने रडणारा इमोजी पोस्ट केला आहे.

आलिया कश्यपची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टवर आलियाचे चाहते सतत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. कलाकारांबाबत अथवा मोठ्या व्यक्तींबाबत अनेकदा अकाउंट हॅक झाल्याच्या बातम्या येत असतात.

आलिया तिचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील चालवते. अलीकडेच, तिने तिच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओत मद्यपान आणि डेटिंग जीवनाच्या बातम्यांबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिच्या या व्हिडिओमध्ये आलियाने तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने एका डेटिंग अॅपद्वारे बॉयफ्रेंड शेनला भेटल्याचे सांगितले होते. दोन महिने गप्पा मारल्यानंतर ते एकमेकांना भेटले.

Leave a comment

Your email address will not be published.