मुंबई : सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या खाजगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत पाहायला मिळतो. त्याच्यासोबतच त्याची मुलगी आलिया कश्यप तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयर यांच्याही सोशल मीडियावर कायम चर्चा होत असतात. दरम्यान, आता आलिया तिच्या बॉयफ्रेंडसोबत नवीन घरात शिफ्ट झाली आहे. या नवीन घराचा होम टूरचा व्हिडिओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
आलियाने त्यांच्या घराचा संपूर्ण व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. रेकॉर्डिंग करत असताना शेन दरवाजा ठोठावतो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर आलिया तिच्या संपूर्ण घराचा फेरफटका मारते. व्हिडिओच्या सुरुवातीला, आलिया प्रथम प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या मुलीच्या बेंचबद्दल सांगते की कोणीही बाहेरून येऊन येथे आरामात बसून शूज काढू शकतो.
व्हिडिओमध्ये आलियाने तिचे घर खूप सुंदर सजवलेले दिसते. तिच्या लिव्हिंग रूममध्ये आलिशान सोफे आणि शेल्फ असल्याचेही दिसत आहे. सोफ्यासमोर बसवलेला टीव्ही दिवाणखान्याची शोभा वाढवत आहे. व्हिडीओ बनवताना दोघांनीही त्यांच्या नवीन घराची छोटीशी माहिती लोकांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे.