मुंबई : आयपीएल 2022 च्या 41 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यातही केकेआरचे फलंदाज फ्लॉप ठरले आणि 83 धावांवर 6 विकेट गमावल्या.
मात्र, त्यांचा संघ बाद होत असताना 146 धावांपर्यंत पोहोचू शकला. या सामन्यात केकेआरने अनेक बदल केले पण पॅट कमिन्सला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नाही.
कमिन्सला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पाहिल्यानंतर भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग खूप दुखावला आहे आणि त्याने ट्विट करून केकेआर व्यवस्थापनावर टीका केली.
कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध मोसमातील त्याच्या पहिल्या सामन्यात 14 चेंडूत 50 धावांची शानदार खेळी केली पण या सामन्याव्यतिरिक्त, कमिन्स गोलंदाजीत फ्लॉप ठरला, डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये तो महागात पडला.
कदाचित यामुळेच KKR चा त्याच्यावरील विश्वास खूप लवकर उडाला पण युवी कमिन्सला वगळण्यात आल्याने आश्चर्यचकित झाला आणि त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या व्यवस्थापनावर टीका करत ट्विटमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.
युवीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आणि लिहिले की, “पॅट कमिन्स बाहेर पडल्याचे पाहून मला खूप आश्चर्य वाटले, जर तो दुखापतग्रस्त नसेल तर खूप आश्चर्य आहे. जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू.
I’m so surprised to see @patcummins30 sit out unless he’s injured ? World class all rounder . If someone has had 2 3 tough games does it mean u stop believing in your match winners? cause they can win you 3 in a row aswell !!just my opinion 🤷🏻♂️ #DCvKKR
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) April 28, 2022
जर एखाद्या खेळाडूसाठी 2 किंवा 3 सामने खराब झाले तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या मॅच विनवर विश्वास ठेवणार नाही का? पण तो तुम्हाला सलग 3सामने जिंकू शकतो!! हे फक्त माझे मत आहे.”