मुंबई : विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा लिगर हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. पण ज्या पद्धतीने लोक या चित्रपटाची वाट पाहत होते, त्याप्रमाणे हा चित्रपट त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. चित्रपट प्रेक्षकांना काही विशेष आवडत नाही, समीक्षकही नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. प्रेक्षक विजय देवरकोंडाच्या अभिनयाचे कौतुक करत असले तरी अनन्या पांडेच्या खराब अभिनयाला खूप ट्रोल केले जात आहे. अनन्याच्या अभिनयाबद्दल संतप्त झालेल्या नेटिझन्सनी तिला चित्रपटांमध्ये कास्ट करणे थांबवा असेही सांगितले.

चित्रपट रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर अनन्या पांडे ट्रेंड करत आहे. यूजर्स अभिनेत्रीला वाईट पद्धतीने ट्रोल करत आहेत. एका ट्विटर यूजरने लिहिले की, लीगर हा एक वाईट चित्रपट आहे, यात शंका नाही पण अनन्या पांडेचा चित्रपटातील वाईट अभिनय मला सहन होत नव्हता. अनन्या पांडेला तेलुगु चित्रपटांमध्ये कास्ट करणे थांबवा, असेही युजरने लिहिले आहे.

तर दुसरीकडे आणखी एका युजरने चित्रपटाची क्लिप शेअर केली आणि लिहिले की व्वा काय अभिनय आहे. “त्यांना ऑस्कर द्या.” आणखी एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, अनन्या पांडे विचार करत असेल की लोकांना माझा तिरस्कार करू द्या, मी माझ्या नाकाला माझ्या जिभेने टच करते”

रॉकेट सिंग नावाच्या युजरने लिहिले की, माझा टूथब्रश लीगरमधील अनन्या पांडेच्या अभिनयापेक्षा चांगला एक्सप्रेशन देऊ शकतो. अनन्या पांडे तिच्या खराब अभिनयामुळे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनन्या पांडे अनेकदा वादात सापडली असून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.

पुरी जगन्नाध दिग्दर्शित लिगर या चित्रपटात विजय देवरकोंडा एका फायटरच्या भूमिकेत आहे आणि अनन्या पांडे त्याच्या मैत्रिणीची भूमिका करत आहे. बाहुबलीमध्ये शिवगामी देवीची भूमिका साकारणारी रम्या कृष्णन विजयच्या आईची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट विजयचा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कामगिरी काही विशेष ठरली नाही. 25 ऑगस्ट रोजी या चित्रपटाने थिएटरमध्ये धूम ठोकली आणि आतापर्यंत एकूण 25 कोटींचा व्यवसाय करू शकला आहे.