मुंबई : मदर्स डेच्या निमित्ताने बी-टाऊनमधील अनेक स्टार्सनी सोशल मीडियावर एकापेक्षा एक सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये करीना कपूर खान (Karina kapoor khan) आणि सारा अली खान (Sara ali khan) यांची मदर्स डे पोस्ट सर्वाधिक व्हायरल होत आहे.

आधी करीना कपूर खानने तिच्या दोन्ही मुलांसोबतचा पूलमधला एक अतिशय आकर्षक फोटो पोस्ट करून मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या, तर सारा अली खानने देखील अमृताचा असा फोटो पोस्ट केला ज्यामध्ये ती दोन्ही मुलांसोबत पूलमध्ये दिसत आहे.

करीना कपूर खानची पोस्ट

समोर आलेल्या या फोटोत करीना आपल्या दोन्ही मुलांसोबत पाण्यात मस्ती करताना दिसत आहे. करीना कपूरने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये, बेबो तिच्या दोन्ही मुलांसह अतिशय सुंदर दिसत आहे. यासोबतच तिचा हा फोटो शेअर करत करीनाने एक सुंदर कॅप्शन देखील दिले आहे.
सारा अली खानची पोस्ट

मदर्स डेच्या निमित्ताने सारा अली खानने आई अमृता सिंगसोबतच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. सारा-अमृताच्या या सर्व फोटोंमध्ये अमृताची पूल स्टाईल चाहत्यांना सर्वाधिक आवडली. फोटोमध्ये अमृता दोन्ही मुलांसोबत पूलमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. अशा स्थितीत करीना आणि अमृता यांचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटिझन्स म्हणत आहेत की, दोघी पतौडी बेगम सारख्याच दिसत आहेत.

यासोबतच साराने स्वतःचे आणि आई अमृताचे काही फोटो शेअर करताना एक खास कॅप्शनही दिले आहे. सारा अली खानने लिहिले, ‘हॅपी मदर्स डे मम्मी. मी तुझ्या पोटात असल्यापासून तुझ्यावर नितांत प्रेम करते. तुला अभिमान वाटावा म्हणून मी चमकण्याचा प्रयत्न करते आहे.

Leave a comment

Your email address will not be published.