मुंबई : SS राजामौली यांच्या RRR चित्रपटातील तेलुगू अभिनेता ज्युनियर NTR च्या दमदार अभिनयाने लोक खूप प्रभावित झाले. चित्रपटातील त्याच्या अनेक दृश्यांवर चित्रपटगृह टाळ्या आणि शिट्ट्यांनी भरून गेले होते. आता ज्युनियर एनटीआरला अशा व्यक्तीकडून कौतुक मिळाले आहे ज्याची तो नेहमीच आठवण ठेवेल.

भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी हैदराबादमध्ये एनटीआर यांची भेट घेतली. या भेटीचे फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. आणि RRR अभिनेत्याचे खूप कौतुकही केले.

तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील मुनुगोडू येथे जाहीर सभेसाठी अमित शाह पोहोचले होते. या सार्वजनिक सभेनंतर शाह ज्युनियर एनटीआर यांची हॉटेलमध्ये भेट झाल्याचे वृत्त आहे. त्यांनी अभिनेत्यासोबतचे फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत.

फोटो पाहून असंही दिसतंय की दोघांमध्ये काही काळ गहिरा संवाद झाला होता. आपल्या ट्विटमध्ये, एनटीआरवर कौतुकाचा वर्षाव करताना, शाह यांनी लिहिले, ‘तेलुगू सिनेमातील एक अतिशय प्रतिभावान अभिनेता आणि रत्न ज्युनियर एनटीआरसोबत हैदराबादमध्ये चांगला संवाद साधला.’

एनटीआर यांनीही गृहमंत्र्यांची पोस्ट ट्विटरवर शेअर करून त्यांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘अमित शाह जी तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि आनंददायी संवाद झाला. या प्रशंसापर शब्दांबद्दल धन्यवाद.

नेटफ्लिक्सवर आरआरआर आल्यानंतर या चित्रपटाला आणि एनटीआरच्या कामाला जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला आहे. राजामौली यांच्या प्रोजेक्टच्या यशानंतर त्यांनी त्यांच्या दोन नवीन चित्रपटांची घोषणा केली आहे. एनटीआर केजीएफ फ्रँचायझी दिग्दर्शक प्रशांत नीलसोबत एक चित्रपट करणार आहे.

या चित्रपटाचे शीर्षक अद्याप समोर आलेले नाही, परंतु चाहते त्याला NTR 31 म्हणत आहेत. असे सांगितले जात आहे की या चित्रपटात तो एक अशी व्यक्तिरेखा साकारणार आहे जी त्याने यापूर्वी कधीही साकारली नव्हती, काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की हा चित्रपट यशच्या केजीएफ युनिव्हर्सशी संबंधित असेल.