हिवाळ्यात थंडी आणि आजारांपासुन बचाव करण्यासाठी ज्यापद्धतीने उबदार कपड्यांची मदत घेता, त्याचपद्धतीने आहाराकडेही लक्ष देणे तितकेच आवश्यक असते. कारण याकाळात अनेक आजार निर्माण होतात. अशात निरोगी व आजारांपासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींचे सेवन करणे गरजेचे असते.

यातीलच एक म्हणजे तीळ ज्याचे सेवन हिवाळ्यात खूपच फायद्याचे मानले जाते. यात शरीरासाठी फायदेशीर असणारे फायबर, लोह, कॅल्शियम आणि ओमेगा-6 सारखे अनेक पोषक घटक असतात. म्हणून हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात तीळ खाल्ल्याने कोण- कोणते फायदे होतात.

केसांसाठी फायद्याचे

हिवाळ्यात केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु थंड वातावरणात तीळ खाणे केसांसाठी वरदान ठरू शकते. तिळाचे तेल वापरणे किंवा तीळ रोज खाल्ल्याने केस गळणे कमी होते. यामुळे तुमच्या केसांमधील कोंड्याची समस्याही बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

प्रतिकारशक्ती वाढते

हिवाळ्याचा ऋतू एकीकडे उष्णतेपासून दिलासा देतो, तर दुसरीकडे अनेक प्रकारचे संसर्ग, विषाणूजन्य आजारही घेऊन येतो. या सर्व आजारांपासून तुम्ही मुक्त होऊ शकता. जर तुम्ही थंडीत रोज तिळाचे सेवन केले तर अँटीऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त होते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

त्वचा निरोगी आणि सुंदर होते

तीळ खाल्ल्याने शरीर आणि त्वचेला आतून पोषण मिळते. तिळाच्या तेलाने मसाज केल्यानेही त्वचा निरोगी राहते. ते त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यास मदत करते. तिळाचे रोज सेवन केल्याने त्वचा सुंदर होते आणि चेहऱ्यावर ग्लो दिसू लागते.

हृदय निरोगी राहते

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तीळ खाणे फायदेशीर आहे. तिळामध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात जे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करतात, ज्यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो. एवढेच नाही तर तीळ रक्तदाबही नियंत्रित ठेवतो.

मन तीक्ष्ण होते

तीळामध्ये आढळणारे पोषक तत्व तणाव कमी करण्यास मदत करतात. तीळ मेंदूच्या पेशी तयार करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे मन तीक्ष्ण होते आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे रोज तीळ खाणे आवश्यक आहे. तर तुम्ही तीळ खाण्याचे फायदे पाहिले असतील, त्यामुळे आजपासूनच तीळ खाणे सुरू करा.