आपण सर्वजण सकाळी दात घासून स्वच्छ करतो. पण नुसते दात स्वच्छ ठेवले म्हणजे संपूर्ण तोंड स्वच्छ होते असे नाही. तोंडाच्या संपूर्ण स्वच्छतेसाठी, जीभ स्वच्छ दात स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे.

जीभ व्यवस्थित स्वच्छ न केल्यास श्वासाच्या दुर्गंधीपासून ते अनेक आजार होऊ शकतात. जीभ साफ न केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. पण अनेकांना जीभ कशी स्वच्छ करावी हे माहीत नसते. आज तुम्हाला जीभ स्वच्छ करण्याच्या टिप्स सांगत आहोत.

मीठ

घरच्या स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवणारे मीठ जीभ स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. मीठ हा एक प्रकारचा नैसर्गिक स्क्रब आहे. जीभ स्वच्छ करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने गार्गल करा, त्यासोबत जीभेवर मीठ शिंपडून आणि टूथब्रशच्या मागील बाजूने स्क्रब करूनही स्वच्छ करता येते.

कोरफड

कोरफड ही एक अशी वनस्पती आहे, जी त्वचा, केस आणि आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण कोरफड वापरून तुम्ही तुमची जीभ स्वच्छ करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? एलोवेरा जेलने जिभेचे डाग दूर होतात.

हळद

स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या हळदीनेही दात आणि जीभ स्वच्छ करता येतात. यासाठी जिभेवर हळद शिंपडा आणि ब्रशच्या मागील बाजूस स्क्रब करा. तुम्ही टंग क्लीनर देखील वापरू शकता. यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

दही

दही खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकलेच असतील. पण तुम्हाला माहित आहे का की दह्याच्या वापराने जीभ साफ करता येते. दही हे प्रो-बायोटिक आहे. यामुळे जिभेवरील बुरशी, पांढरा थर आणि जिभेवर साचलेली घाण अशा सर्व समस्यांवर हे फायदेशीर आहे. यासाठी जिभेवर थोडे दही लावून तोंड चालवावे व नंतर पाण्याने धुवावे. असे केल्याने जिभेची घाण नाहीशी होते.

बेकिंग सोडा

जीभ स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरता येतो. यासाठी लिंबाच्या रसात थोडासा बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट बोटांच्या मदतीने जिभेवर लावा आणि चोळा. काही वेळाने पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे जिभेवरील पांढरा थर साफ होईल.