लसूण खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो, हे तुम्हाला माहीतच आहे. पण तुम्हाला माहित आहे का? की त्यासोबतच लसणाची पातही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. अनेकदा लसूण काढून तुम्ही लसणाची पात फेकून देता. मात्र असे करणे चुकीचे आहे. कारण लसणाच्या पातीचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.

यासाठी आज आम्ही तुम्हाला लसणाची पात खाण्याचे फायदे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ लसणाची पात खाणे कशाप्रकारे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

कोलेस्टेरॉलची पातळी राखते

कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यात लसणाची पात महत्त्वाची भूमिका बजावते. ऍलिसिन हा सक्रिय घटक लसणाच्या पातीमध्ये असतो. जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

रक्ताभिसरण सुधारते

रक्ताभिसरण सुधारण्यासाठी लसणाची पात खूप उपयुक्त ठरते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीरात लोह शोषण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने शरीरातील लाल रक्तपेशींचे प्रमाण वाढते आणि रक्ताभिसरण बरोबर राहते.

चांगले पचन

लसणाच्या पातीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. या पातीचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. तसेच, पोट फुगण्याची समस्या होत नाही.

चयापचय क्रिया मजबूत होते

लसणाच्या पातीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बायोटिक गुणधर्म पोटातील बॅक्टेरियाचे संतुलन राखण्यास मदत करतात. यासोबतच ते चयापचय चांगले राखण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात.

शरीर डिटॉक्स करण्यासाठी

लसणाची पात शरीराला डिटॉक्स करण्यास देखील मदत करतात. एवढेच नाही तर लसणाची पात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही खूप मदत करते. तुम्ही लसणाची पात पाण्यात उकळून वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास लसणाच्या पातीची भाजी बनवून किंवा सॅलडमधून सेवन करू शकता.

Leave a comment

Your email address will not be published.