राज्यात ईडीचे (ED) धाडसत्र सुरुच आहे. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके (Satish Uke) यांना जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी ‘नो कमेंट’ (No comment) सांगत सावध प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्यात मुद्द्यावर आपण चर्चा करतो, असेही पवार म्हणाले आहेत.

प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी गुरुवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली, व सतीश उके आणि प्रदीप उके (Pradeep Uke) यांना ईडीच्या ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे. असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केला आहे, मात्र अजित पवारांनी यावर बोलणे टाळले आहे.

दरम्यान, सतीश उके यांच्यावरील ईडीने टाकलेल्या धाडीनंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी एक ट्वीट (Tweet) केलं आहे. ‘आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू’, अशा शब्दात पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच ‘मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठविणाऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल, असा संदेश दिला जात आहे. पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू’, असे ट्वीट करत पटोले यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर (Bjp) जोरदार टीका केली आहे.

Leave a comment

Your email address will not be published.